लठ्ठपणाची समस्या ही शारीरिक समस्येपेक्षा मानसीक समस्या अधिक असल्याचे दिसून येतं. कारण जाड असणं किंवा वजन वाढणं ही जरी शारीरिक स्थिती असती तरी याचा त्या व्यक्तीच्या मनावर ताण येत असतो. आपण इतरापेक्षा जाड आहोत किेंवा आपल्याला हवे तसे कपडे घालता येत नाही याची नेहमी खंत वाटत असते. जीमला जाऊन, कमी आहार घेऊन अशा अनेक प्रकारांचा वापर करून वजन कमी होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात.
तुम्ही सुद्धा वजन वाढण्याच्या समस्येचा सामना करत असाल तर आम्ही तुम्हाला एक विशेष डाएट प्लान सांगणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही प्रत्येक आठवड्याला एक किलो वजन कमी करू शकता. चला तर मग जाणून घेऊया या खास डाएट प्लॅन. हा डाएट प्लॅन जर तुम्ही रेग्युलर फॉलो कराल तर एका महिन्यात तब्बल चार किलो वजन कमी करू शकता.( हे पण वाचा-पाय आणि छातीत दुखतंय? असू शकतो जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)
या डाएटप्लॅनमध्ये सुपर कार्ब्स डाएटचा समावेश आहे. सुपर फुड्स म्हणजे यात स्टार्चचे प्रमाण अधिक आहे. रताळे, सीताफळ. आणि सगळ्या प्रकारच्या डाळी आणि वाटाण्यांचा यात समावेश होतो.( हे पण वाचा-घरच्याघरी 'हे' योगासन कराल तर पोटाची चरबी होईल नक्की होईल कमी)
सुपर ग्रेन्स मध्ये चपाती, रवा, ओट्स आणि ज्वारी , बाजरी, ब्राऊन राईस, यांचा समावेश असतो. त्यामुळे तुम्ही आहारात तांदळाचा वापर करण्याऐवजी ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीचा समावेश करू शकता.
सकाळच्या नाष्यात फायबरर्स मोठ्या प्रमाणात असलेल्या पदार्थाचा समावेश करा. त्यामुळे तुमच्या शरीरात रक्तातील साखरेची पातळी सुरळीत राहील. तसंच मेटाबॉलीजम सुद्धा चांगलं राहील. ज्यामुळे तुम्ही दिवसभरात चांगल्याप्रकारे कॅलरीज बर्न करू शकता. सकाळच्या नाष्त्यासाठी तुम्ही कोणतीही तुमच्या पसंतीचा पदार्थ खाऊ शकता. पण त्यात वापरलेल्या तेलाचे प्रमाण फार कमी असावे. ब्रेकफास्टसाठी तुम्ही ३०० कॅलरीज घेऊ शकता.
दुपारचं आणि रात्रीचं जेवण
दुपारच्या आणि रात्रीचा आहार घेताना तुम्ही जेवणाच्या ऐवची सुपरस्टार्च असलेल्या पदार्थांचा समावेश करा. ज्यात डाळी, भाज्या तुम्ही खाऊ शकता. तुमचं दुपारचं जेवणं ५०० कॅलरीचं असावं आणि रात्रीचं जेवण ४०० कॅलरीज देणारं असावं. यासाठी तुम्ही वर दाखवण्यात आलेल्या कोणत्याही पदार्थांचा समावेश करू शकता. जेवणाच्या मधल्या वेळेत भूक लागल्याल तुम्ही २ वेळा खाऊ शकता. स्नॅक्स मध्ये तुम्ही उकळलेल्या हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. ज्यात ३- ३ ग्राम फायबर आणि स्टार्च तसंच प्रोटिन्स असावेत, तुम्ही घेत असलेल्या स्नॅक्स मध्ये १५० पेक्षा जास्त कॅलरीज नसाव्यात.
लसूण- लसणाच्या सेवनाने तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.
आलं- आल्यात एन्टी-इफ्लामेंट्री गुण असतात त्यामुळे शरीराला आजारांपासून दूर ठेवण्यासाठी तसंच मॅटाबॉलिझम जलद होण्यासाठी हे फायदेशीर ठरतं असतं.
हळद- हळदीच्या औषधी गुणांमुळे तुम्ही आजारांपासून दूर राहू शकता. हळदीच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहतं.