शारीरिक आरोग्यासाठी हृदय निरोगी (Healthy Heart) असणं आवश्यक असतं. सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे (Lifestyle) कमी वयातच अनेकांना हृदयविकाराचा सामना करावा लागतो. चुकीची जीवनशैली आणि आहारामुळे (Diet) लोक हृदयविकाराचे शिकार होत आहेत.
दररोज हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हृदयाचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी कार्डिओव्हस्क्युलर एक्सरसाईज आणि सकस आहाराचं सेवन आवश्यक असतं. ज्या व्यक्तीचे वजन अधिक असते किंवा जे लठ्ठपणाचा सामना करीत असतात, त्यांना हृदयविकार होण्याची शक्यता अधिक असते.
हृदयामुळे आपल्या शरीरात शुद्ध रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. मात्र हृदय विकार झाल्यास त्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे हायपरटेन्शन (Hypertension) किंवा हायपोटेन्शनसारख्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. तसंच शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने देखील हृदयविकाराचा सामना करावा लागतो.
सध्या कमी वयातच या समस्या भेडसावू लागल्याने योग्य आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देत, आहार- विहाराच्या काटेकोर नियमांचे पालन करणं गरजेचं बनले आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी अँटी-ऑक्सिडेंट, पोषक आहार आणि पेयांचे (Drinks) सेवन करावं. जाणून घेऊया हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या पोषक पेय म्हणजे हेल्दी ड्रिंक्सविषयी. डाएट एक्स्पर्ट रंजना सिंह यांनी ही माहिती झी न्युजच्या वेबसाईटला दिली आहे.
ब्रोकोली आणि पालकाचा ज्यूसब्रोकोली (Broccoli) आणि पालक (Spinach) या दोन्ही भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असतात. यात केरोटेनाईडस विपुल असतं. ते अनावश्यक कोलेस्ट्रॉल काढून टाकतं आणि हृदय चांगल राहत. या दोन्हीचं ज्यूस सेवन केलं तर शरीर डिटॉक्सिफाय होण्यास मदत होते. शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कंट्रोलमधील ठेवल्यास हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं आणि शरीराचं विविध आजारांपासून संरक्षण होतं.
गाजर आणि बीटाचा ज्यूसबीटामध्ये (Beetroot) नायट्रेट असतं. शरीरात गेल्यावर त्याचे रुपांतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये होतं. गाजरामध्ये (Carrot) देखील नायट्रेट असतं. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो. तसंच गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन असतं. यामुळे रक्तवाहिन्या स्वच्छ राहण्यास मदत होते. गाजर आणि बिटाचं सेवन केल्यास हृदय हेल्दी राहतं आणि अनावश्यक कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं.
काकडी आणि पुदिन्याचा ज्यूसउन्हाळ्यात काकडीचं (Cucumber) सेवन आवश्यक असतं. काकडी पचनशक्ती वाढवते आणि पोट थंड ठेवते. तसंच शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढते. काकडीतील फायबरमुळे बध्दकोष्ठता दूर होते. तसंच ताज्या पुदिन्यात (Mint) अँटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के असतात. या दोन्हीपासून बनवलेले ज्यूस सेवन केल्यास खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि हदयाचे आरोग्य चांगलं राहतं.