शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

दुर्बिणीतून शस्त्रक्रिया उपयुक्त

By admin | Published: July 31, 2015 10:25 PM

दुर्बिणीतून शस्त्रक्रिया उपयुक्त

दुर्बिणीतून शस्त्रक्रिया उपयुक्त
-लेप्रोस्कोपिक सर्जन संघटना : मेडिकलमध्ये तीन दिवसीय परिषदेला सुरुवात
(फोटो आहे...)
नागपूर : पोट उघडून (ओपन) केलेल्या शस्त्रक्रियानंतरही रुग्णाला बऱ्याच वेदना सहन कराव्या लागायच्या. जखमा भरून यायला वेळ लागायचा, परिणामी हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस राहावं लागायचं. याऊलट दुबिर्णीच्या साहाय्याने ऑपरेशनमध्ये कट्स कमी असल्यामुळे वेदना कमी होतात. रु ग्ण लवकर घरी जाऊन काही दिवसांतच आपल्या कामाला पूवीर्प्रमाणे जाऊ शकतो. यामुळे ही सर्जरी उपयुक्त ठरत आहे. तांत्रिकदृष्ट्या यात होत असलेल्या बदलांवर माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी लेप्रोस्कोपिक सर्जन संघटनेच्यावतीने राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रसिद्ध लेप्रोस्कोपिक सर्जन व मेडिकलच्या शल्यशास्त्रविभागाचे विभाग प्रमुख डॉ. राज गजभिये यांन दिली.
तीन दिवस आयोजित या परिषदेचे उद्घाटन गुरुवारी झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
परिषदेचे उद्घाटन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. राज गजभिये, डॉ. कुरेशी, डॉ. अभय दळवी, डॉ. राजेश खजुल्लवार, छत्तीसगडचे डॉ. संदीप दवे उपस्थित होते. दुर्बिणद्वारे (लेप्रोस्कोपी) करण्याचे प्रमाण ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी केले.
लेप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे, शरीरावर मोठे कट्स न देता केवळ दोन ते तीन लहान कट्स देऊन दुर्बिणीच्या साहाय्याने केलेली शस्त्रक्रिया. हे कट्स एक ते तीन सेंटिमीटरचे असू शकतात. या छिद्रातून अत्यंत छोटा पण अतिप्रगत असणारा कॅमेरा नळीच्या आधारे पोटात सोडला जातो. पोटातील आतील दृश्य बघून डॉक्टरांना शस्त्रक्रिया करता येते. कॅन्सर व विनाकॅन्सरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणद्वारे मेडिकलमध्ये केल्या जात असल्याची माहिती डॉ. राज गजभिये यांनी दिली. डॉ. दवे म्हणाले, दुर्बिणद्वारे करण्यात येणारी शस्त्रक्रिया खूप काळजीपूर्वक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने करावी लागते. कॅन्सरच्या शस्त्रक्रियेमध्ये केवळ कॅन्सर काढण्याचे काम नसते तर कॅन्सर पसरविणाऱ्या सर्व गाठी म्हणजे (लिंफ नोड) काढणे खूप आवश्यक असते. परिषदेत जठराचा कॅन्सर, लहान व मोठ्या आतडीचा कॅन्सर, गर्भपिशवीचा कॅन्सर, पित्ताशयाचा कॅन्सर, स्वादुपिंडचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर, लिव्हरचा कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर व इतर अवयवांवर दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियाची माहिती या परिषदेत तज्ज्ञाकडून दिली जाणार आहे.