Sweating While Eating Causes: उन्हाळ्यात किंवा एखादं मेहनतीचं काम केलं असेल तर घाम येणं सामान्य समजलं जातं. मात्र, काही लोक असेही असतात ज्यांना जेवण करताना खूप घाम येतो. पण जास्तीत जास्त लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाहीत की, असं का होतं?
अनेकांना हे माहीत नसतं की, जेवण करताना घाम येणं सामान्य आहे की चिंताजनक. जर तुम्हालाही जेवण करताना घाम येत असेल तर चिंता करू नका. पण काही केसेसमध्ये हा चिंतेचा विषय असू शकतो. चला तर जाणून घेऊ जेवण करताना घाम येण्याची कारणे...
जेवण करताना घाम येण्याची कारणे
पचनक्रिया
जेवण पचवण्याच्या प्रक्रियेत शरीर एनर्जीचा वापर करतं. या स्थितीत शरीराचं तापमान थोडं वाढू शकतं, ज्यामुळेही घाम येतो. इतकंच नाही तर मसालेदार, तिखट किंवा गरम जेवण केल्याने पोटात जास्त गरमी वाढते, ज्यामुळेही घाम येतो. ही शरीराची एक नॅचरल पद्धत आहे, तर तापमान नियंत्रित करण्यास मदत करतं.
हायपरहाइड्रोसिस
ही एक अशी स्थिती आहे ज्यात शरीरातून सामान्यापेक्षा जास्त घाम येतो. हा घाम कधीही येतो. जेवण करतानाही. जास्त घाम आल्याने रोजचं जीवन प्रभावित होतं. या कंडीशनसाठी डॉक्टरांची मदत घेणं फायदेशीर ठरतं.
मेटाबॉलिज्म
मेटाबॉलिज्मचा दर वाढल्याने घाम येऊ शकतो. काही लोकांमध्ये मेटाबॉलिज्म दर सामान्यपेक्षा जास्त असतो, ज्यामुळे त्यांना इतरांपेक्षा जास्त घाम येतो.
मेडिकल कंडीशन
काही मेडिकल कंडीशन जसे की, थायरॉईड, डायबिटीस आणि हृदयरोगामध्ये जेवण करताना घाम येण्याची शक्यता असते.
तणाव आणि चिंता
तणाव आणि चिंतेमुळे हृदयाची गति आणि ब्लड प्रेशर वाढतं. ज्यामुळे घाम येऊ शकतो. जेवण करताना तणाव घेतल्यानेही तुम्हाला घाम येऊ शकतो.
नर्वस सिस्टम
नर्वस सिस्टम डॅमेज झाल्याने अनेकदा जेवण करताना घाम येऊ शकतो. नर्व डॅमेज झाल्याने मेंदुपर्यंत संकेत पोहोचत नाहीत आणि यामुळे घाम येऊ लागतो.
चिंतेचा विषय कधी?
जर जेवण करताना तुम्हाला जास्त घाम येत असेल आणि याने तुमचं रोजचं जीवन प्रभावित होत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांना संपर्क केला पाहिजे. कारण काही स्थितींमध्ये ही समस्या गंभीर असू शकते.