(Image Credit : medicalnewstoday.com)
अनेकांना शरीरात सूज असण्याची समस्या असते. ही सूज लठ्ठपणा, डायबिटीस, हृदयरोगांचं मुख्य कारण ठरते. जेव्हा शरीराला असं वाटतं की, बाहेरी एखादा व्हायरस, बॅक्टेरिया आणि इतर मायक्रोऑर्गॅनिज्म अटॅक करत आहेत तेव्हा शरीर यांना रोखण्यासाठी संबंधित अवयवात सूज निर्माण करतं. ही शरीराच स्वत:ची एक सुरक्षा प्रणाली आहे. पण अनेकदा शरीरातील सूजेचं कारण इन्फेक्सन नाही तर दुसरं काही असू शकतं. जे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. याने तुमचे अवयव डॅमेजही होऊ शकतात.
किडनी आणि हृदयरोगांचा रूग्णांवर टेस्ट
मनुष्यांआधी अभ्यासकांनी टेस्ट ट्यूब एक्सपरिमेंट केलं, नंतर उंदरांवर टेस्ट केली. जेणेकरून मनुष्यांवर या स्थितीत काय प्रभाव होतो याचा अंदाज घेता यावा. त्यानंतर टेस्ट करण्यासाठी काही मनुष्यांची निवड करण्यात आली. ज्यांना क्रॉनिक किडनी रोग किंवा हृदयरोग असतील अशांची निवड केली गेली. यातून असं आढळून आलं की, ट्रायग्लिसरइड्समुळे होणारी सूज त्यांची किडनी आणि धमण्यांना डॅमेज करते. अभ्यासकांनुसार, रक्तात हाय लिपिड लेव्हल खासकरून ट्रायग्लिरसाइड्समुळे शरीरात घातक सूज येण्याची स्थिती निर्माण होऊ शकते.
रक्तात जास्त ट्रायग्लिसराइड गंभीर
नेचर इम्यूनोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्च जर्मनीच्या सारलॅंड युनिव्हर्सिटीच्या डॉ. टिमो स्पीर आणि त्यांच्या टिमने केला. त्यांनी सांगितले की, रक्तात ट्रायग्लिसराइडचं वाढलेलं प्रमाण तुमच्या शरीरात सूज निर्माण करू शकतं. हे जीवघेणंही ठरू शकतं. रक्तातील ट्रायग्लिसराइड्सला ब्लड फॅट असंही म्हटलं जातं.
सूज आल्याने काय होतो प्रभाव
अभ्यासकांनी दावा केला आहे की, हाय ब्लड फॅट शरीरात सूज निर्माण करू शकतात, ज्यामुळे व्यक्तीच्या अनेक क्रिया प्रभावित होतात. हे इतकं घातक ठरू शकतं की, अनेकदा शरीरातील अवयव किंवा धमण्या पूर्णपणे डॅमेज होतात. व्यक्तीच्या रक्ता जेवढे जास्त फॅट असतील, त्या व्यक्तीचा तेवढ्या लवकर मृत्यूचा धोका वाढतो.