(Image Credit : THE PLUVIOPHILE)
तुम्हीही समुद्र किनारी फिरायला जाणार असाल आणि समुद्राच्या लाटांमध्ये स्वत:ला झोकून देऊन पाण्याचा आनंद घेण्याचा विचार करत असाल तर त्याआधी एकदा हे वाचा. समुद्राच्या पाण्यात पोहणे, खेळणे आणि मस्ती करणे भलेही एक भन्नाट आणि कुणालाही हवाहवासा वाटणारा अनुभव असेल, पण एका रिसर्चनुसार समुद्राच्या पाण्यात पोहणे किंवा आंघोळ केल्याने स्किम मायक्रोबायोममध्ये बदलतले. ज्यामुळे कान आणि त्वचेवर इन्फेक्शनचा धोका वाढतो.
मायक्रोबायोममध्ये बदल म्हणजे इन्फेक्शनप्रति अतिसंवेदनशीलता
(Image Credit : Frothy Beard)
अमेरिकन सोसायटी फॉर मायक्रोबायॉलॉजीच्या वार्षिक सभेत 'एएसएम मायक्रोब २०१९' मध्ये या रिसर्चचे निष्कर्ष ठेवण्यात आलेत. याबाबत अभ्यासकांनी सांगितले की, मायक्रोबायोममध्ये बदल इन्फेक्शन प्रति अतिसंवेदनशील ठरू शकतं. कॅलिफोर्निया विश्वविद्यालयात पीएचडी करणारी विद्यार्थी आणि या रिसर्चची मुख्य लेखिका मारिसा चॅटमॅन नील्सन म्हणाली की, 'आमच्या डेटाने हे पहिल्यांदाच प्रदर्शित केलं आहे की, समुद्राच्या पाण्याच्या संपर्कात आल्यावर व्यक्तीच्या त्वचेच्या विविधतेत आणि संरचनेत बदल होऊ शकतो'.
पोट, श्वास आणि त्वचेसंबंधी समस्या
(Image Credit : KissCC0)
अभ्यासकांना असंही आढळलं की, समुद्रातील पाण्याच्या संपर्कात आल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल म्हणजेच पोटाशी संबंधित आजार, श्वासासंबंधी आजार, कानात इन्फेक्शन आणि स्किन इन्फेक्शनचा धोका अनेक पटीने वाढतो. या रिसर्चसाठी अभ्यासकांनी बीचवर असलेल्या ९ व्यक्तींची तपासणी केली, त्यांना समुद्रातून आल्यावर १२ तास आंघोळ करून दिली गेली नाही. तसेच त्यांना सनस्क्रीनचा वापर न करण्यासही सांगण्यात आलं. त्यासोबतच याचीही काळजी घेण्यात आली की, त्यांनी गेल्या सहा महिन्यांच्या काळात अॅंटी-बायोटिक औषधांचं सेवन केलं नसेल.
आंघोळीच्या आधी आणि नंतर घेतले सॅम्पल
समुद्राच्या पाण्यात जाण्याआधी या रिसर्चमध्ये सहभागी लोकांच्या पायांच्या मागच्या बाजूच्या स्किनचे नमूने कॉटनच्या मदतीने घेण्यात आले होते. जेव्हा हे लोक समुद्रात पोहून १० मिनिटांनी परत आले आणि शरीर पुसलं, त्यानंतर ६ तास आणि २४ तासांनी पुन्हा नमूने घेतले गेले. या रिसर्चच्या निष्कर्षातून ही बाब समोर आली की, समुद्रात स्विमिंग करण्याआधी प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर वेगवेगळ्या प्रकारचे कम्यूनिटीज होते, पण स्विमिंगनंतर सर्वांच्या शरीरावर एकसारखे कम्यूनिटीज होते.