तुम्ही हे बऱ्याचदा पाहिलं असेल की, सकाळी उठल्यावर अनेक वेळा डोळ्यांखाली आणि पापण्यांना सूज येते. ज्यामुळे व्यक्तीचा चेहेरा देखील वेगळा दिसतो. डोळ्यांना सूज येणे ही समस्या अनेक कारणांमुळे असू शकते. हे सामान्य कारणांमुळे देखील असू शकते जसे की झोप न लागणे, तणाव आणि ऍलर्जी किंवा त्याचे गंभीर कारण देखील असू शकते. जास्त मीठ खाणे, कमी पाणी पिणे आणि डोळे चोळणे यामुळे देखील ही समस्या उद्भवते. जर तुम्हीही डोळ्यांना सूज येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर यापासून तुम्हाला घरगुती उपायांच्या माध्यमातून देखील आराम मिळेल.
टी बँगमुळे जळजळ निघून जाईलबऱ्याच लोकांना ग्रीन टी किंवा टी बँग वापरुन चहा पिण्याची सवय असते, असे लोकं चहा प्यायल्यानंतर चहाची पिशवी फेकून देतात. परंतु तसे न करता या पिशवीचा तुम्ही पुन्हा वापर करु शकता.
डोळ्यांची सूज दूर करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. चहाच्या पिशव्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म सूज कमी करण्यासाठी तसेच डोळ्यांखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. यासाठी चहाची पिशवी फ्रीजमध्ये ठेवा आणि रात्री झोपताना सुमारे १५ मिनिटे डोळ्यांवर ठेवा. यामुळे डोळ्यांना आराम मिळतो.
बर्फाचे तुकडे देखील काम करतातबर्फाचे तुकडे वापरल्याने डोळ्यांवरील सूज दूर होते. सुती कपड्यात बर्फाचा तुकडा गुंडाळा आणि डोळ्यांना मसाज करा. यामुळे सूज कमी होण्यास मदत होईल.
चमचा वापरा४ किंवा ५ चमचे घ्या आणि ५ ते १० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर विरुद्ध बाजूने चमचा डोळ्यांवर लावा. यामुळे डोळ्यांचा सूज कमी होतो.
दूध वापराडोळ्यांवरील फुगीरपणा दूर करण्यासाठी दुधाचा देखील वापर केला जाऊ शकतो. एक वाटी दूध घेऊन त्यात कापसाचे गोळे टाकून फ्रीजमध्ये ठेवा. थंड झाल्यावर हे गोळे काही वेळ डोळे बंद करून डोळ्यांवर ठेवा. यामुळे सूज दूर होईल.