अनियमित खाण्यापिण्यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आपण जो आहार घेतो. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे संतुलित आहार घेतल्याने आजारांना दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. पण अनियमित खाण्यापिण्यामुळे लिव्हरच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. त्यापैकीच एक म्हणजे सिरोसिस हा आजार आहे. आज आम्ही तुम्हाला आहार व्यवस्थित नसेल तर लिव्हरवर कसा परिणाम होतो. याबाबत सांगणार आहोत.
लिव्हर सिरोसिस
लिव्हर सिरोसिस या आजारात लिव्हरचा आकार आकुंचन पावतो. पण ही क्रिया इतक्या नकळतपणे होत असते की शरीरातील पेशी सुद्धा खराब होतात. अल्कोहोलचे जास्त प्रमाणात सेवन, अनियमीत आहार, जास्त फॅट्स असलेल्या पदार्थांचे सेवन, व्यायामाच अभाव, जंक फुडचं अतिसेवन यांमुळे ही समस्या उद्भवते .
सिरोसिसची लक्षणं
भूक कमी लागणं
झोप न येण्याची समस्या
हृदयाचे ठोके वाढणे
मासपेशींमध्ये दुखणं
हाताचे पंजे लाल होणं
नाकातून रक्त बाहेर येणं.
उपाय
आवळा
लिव्हर सिरोसिसची समस्या उद्भवल्यास तुम्ही आवळ्याचा वापर करू शकता. आवळा शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरतो. व्हिटामीन सी आवळ्यात मोठ्या प्रमाणात असतं. रोज ३ ते ४ आवळे खाऊन दीर्घकाळ आरोग्य चांगलं ठेवू शकता.
हळद
हळदीचे अनेक फायदे तुम्हाला माहीतच असतील. हळदीतील औषधी गुण मोठ्या आजारांपासून वाचवण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. त्यासाठी रोज रात्री हळदीचे दूध प्या. हळदीमध्ये रोगप्रतिकारकशक्ती वाढवणारी पोषक तत्व असतात. हॅपेटाइटिस बी सारख्या समस्या कमी करण्यासाठी हळदीचा वापर फायदेशीर ठरतो.
व्हिनेगर
इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी व्हिनेगर फायदेशीर ठरते. नियमित व्हिनेगरचं सेवन केल्याने तुम्ही दीर्घकाळापर्यंत तंदरुस्त राहू शकता. एक ग्लास पाण्यात एक चमचा एप्पल साडयर व्हिनेगर आणि मध घालून प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघण्यास मदत होते. ( हे पण वाचा-