Vitamin E Deficiency : शरीर निरोगी ठेवण्यात वेगवेगळे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स खूप महत्वाचे ठरत असतात. वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सपैकी एक म्हणज व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई आपलं शरीर निरोगी ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावतं. व्हिटॅमिन ई एक पॉवरफूल अॅंटी-ऑक्सिडेंट आहे आणि जे आपल्या शरीराचा फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून बचाव करतं. मात्र, हे व्हिटॅमिन शरीरात जर कमी झालं तर शरीराला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. आज त्याचीच माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
व्हिटॅमिन ई कमी झाल्याचे लक्षण
शरीरात व्हिटॅमिन ई कमी झालं किंवा पुरेसं व्हिटॅमिन ई मिळालं नाही तर मांसपेशी कमजोर होतात, दृष्टीसंबंधी समस्या होता आणि रोगप्रतिकारक शक्तीही कमजोर होते. इतकंच नाही तर त्वचा कोरडी पडते, केसगळती होते आणि एनीमियाही होऊ शकतो.
तसेच स्थिती गंभीर असेल तर व्यक्तीला चालण्यात अडचण होते, मांसपेशींमध्ये कंपण होतं. व्हिटॅमिन ई कमी झाल्याने महिलांना प्रजननातही समस्या होऊ शकते. जर यावर वेळीच उपाय केला नाही किंवा उपचार घेतले नाही तर हृदयरोग आणि कॅन्सरसारख्य गंभीर समस्याही होऊ शकतात.
रोज किती व्हिटॅमिन ई ची गरज?
हार्वर्ड हेल्थनुसार, १४ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या पुरूष आणि महिलांना रोज साधारण १५ मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई ची गरज असते. स्तनपान करणाऱ्या महिलांना रोज १९ मिलीग्रॅम व्हिटॅमिन ई ची गरज असते.
कशातून मिळवाल व्हिटॅमिन ई?
हिरव्या पालेभाज्या
व्हिटॅमिन ई ची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्ही नियमितपणे हिरव्या पालेभाज्यांचं सेवन केलं पाहिजे. बदाम आणि अक्रोडही व्हिटॅमिन ई चांगलं सोर्स आहेत. इतकंच नाही तर याने शरीराला इतरही अनेक फायदे मि्ळतात.
फळं
व्हिटॅमिन ई मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये एवोकाडो, कीवी, आंबे अशा फळांचा समावेश करावा. या फळांचं नियमितपणे सेवन केल्याने शरीराला व्हिटॅमिन ई मिळतं.
आणखी कशातून मिळेल हे व्हिटॅमिन
सनफ्लॉवर तेल, सोयाबीन तेल
मोहरीच्या बीया
बदाम
शेंगदाणे
बीट, पालक
भोपळा
लाल शिमला मिरची
व्हिटॅमिन ई कमी होण्याचं कारण...
शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे व्हिटॅमिन ई असलेल्या पदार्थांचं सेवन न करणं. त्याशिवाय ही समस्या अनुवांशिकतेमुळेही होते. तुमच्या कुटुंबात कुणाला ही समस्या असेल तर तुम्हालाही होऊ शकते.