(Image Credit : Collective Evolution)
तुम्ही हे नेहमीच पाहिलं असेल की, आपल्याला कशाप्रकारची चिंता, उत्सुकता किंवा डिप्रेशन असतं तेव्हा आपण याला मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या समजू लागतो. पण असं नाहीये. अनेकजण आरोग्यासंबंधी अशा अनेक समस्यांना मानसिक रोग समजतात. पण अशाप्रकारे गैरसमज करून घेणे किंवा केवळ अंदाज लावणे महागात पडू शकतं. त्यामुळे चला जाणून घेऊ अशा काही समस्यांबाबत ज्यांची लक्षणे हि डिप्रेशनसारखी आहेत. पण मुळात ते डिप्रेशन नसून गंभीर आजारांचे संकेत आहेत.
थायरॉइड
अनेकदा थायरॉइडच्या लक्षणांना डिप्रेशन किंवा चिंतेचं लक्षण मानलं जातं. असं होण्याचं कारण म्हणजे थायरॉइडमुळे व्यक्तीचा मूड आणि त्याची लाइफस्टाइल प्रभावित होते. असंच काहीचं डिप्रेशनमध्येही होतं. त्यामुळे वेळीच थायरॉइडचं चेकअप करून घेणे गरजेचे आहे.
एसटीडी
हा आजार बॅक्टेरिया आणि संक्रमणामुळे पसरतो. या आजारावर वेळीच उपचार केले गेले नाही तर हा आजार मेंदू आणि स्पाइनल कॉर्डला वाईट प्रकारे प्रभावित करतो. या स्थितीला न्यूट्रोसिफलिसही म्हटलं जातं. या आजाराच्या लक्षणांमध्ये कन्फ्यूजन, डिप्रेशन आणि स्मरणशक्ती कमजोर होणे ही आहेत. ही लक्षणे डिप्रेशनच्या लक्षणांसोबत मिळती जुळती आहेत.
न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर
न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर एक अशी स्थिती आहे ज्यात शरीरातील तंत्रिका पेशींच्या हार्मोन उत्पादनात असामान्य वाढ होते. हा ट्यूमर शरीराच्या आतड्यांमध्ये सुरू होतो. सामान्यपणे हा फुफ्फुस आणि अग्नाशयात होतो. हा ट्यूमर फार गंभीर आहे की, नाही हे त्याच्या स्टेजवर निर्भर करतं. जेव्हा शरीरात एट्रीनलीन अधिक प्रमाणात तयार होऊ लागतं तेव्हा अशी स्थिती तयार होते. आणि ही लक्षणे बऱ्यापैकी डिप्रेशनच्या लक्षणांसारखी असतात. जसे की, पॅनिक अटॅक, थकवा आणि चिंता.
लाइम डिजीज
हा एक संक्रमण आजार आहे. हा आजार ब्लॅकलेग्ड टिकच्या चावल्याने होतो. हे किटक कुत्रे, बकऱ्या आणि इतरही जनावरांमध्ये आढळतात. सुरूवातीला या आजाराचा माहिती मिळत नाही आणि जी लक्षणे दिसू लागतात ती बिलकुल डिप्रेशनच्या स्थितीसारखी असतात. त्यामुळे हा आजार धोकादायक ठरू शकतो.
क्रॉनिक फटीग सिंड्रोम
यात फार जास्त थकवा जाणवू लागतो, स्मरणशक्ती कमी होते, झोप कमी लागते आणि लक्ष केंद्रीत होऊ शकत नाही. काही अशीच लक्षणे डिप्रेशनची आहेत.
डायबिटीज
लोक भलेही म्हणत असतील की, त्यांना डायबिटीजच्या लक्षणांबाबत माहिती आहे, पण अनेकदा याची लक्षणेही चमका देतात. डायबिटीजची अशी अनेक लक्षणे आहेत ज्यात व्यक्ती डिप्रेशनचा शिकार असल्याचं जाणवतं. पण मुळात प्रकरण वेगळंच असतं. चिडचिड होणे, मूड बदलणे आणि वजन कमी होणे यांसारखी लक्षणे डिप्रेशनच्या स्थितीतही होतात आणि डायबिटीजमध्येही दिसतात.
(टिप - यातील कोणतीही समस्या किंवा शंका असेल तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क करा. केवळ लक्षणांच्या आधारावरच आजाराला जज करू नका. वरील मुद्दे केवळ माहिती म्हणून तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. मात्र डॉक्टरांचा योग्य सल्ला आणि उपचार घ्यावेत)