शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करणं ठरू शकतं जीवघेणं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 5:59 PM

वयस्कर माणसांना नाहीतर मध्यम वयाच्या लोकांना सुद्धा हृदयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो.  

सध्याच्या बदलत्या जीवनशैलीत अमियमीत खाणं पिणं, झोपेची कमतरता आणि आहार घेण्याच्या पद्धतीत ताळमेळ नसणं यांमुळे वयस्कर माणसांना नाहीतर मध्यम वयाच्या लोकांना सुद्धा हृदयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो.  ४० ते ६५ या वयोगटात हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण जास्त असतं.  हार्ट अटॅक येण्यापूर्वी काही संकेत येऊ लागतात. आज आम्ही तुम्हाला हार्ट अटॅक यायच्या आधी कोणती लक्षणं दिसतात याबाबत सांगणार आहोत.

कोणताही अटॅक मेंदूचा असो किंवा हार्टचा अचानक येत असतो. काही आठवडे आधी शरीरात बदल दिसून येतात. चालताना छाती खूप जास्त हेवी झाल्यासारखी वाटते.  त्याला एंजायना पेन असं सुद्धा म्हणतात. छाती जड झाल्यासारखी वाटणं हे हृदयाच्या आजारांचे मोठं लक्षण आहे.

अचानक श्वास घ्यायला त्रास होतो. चालताना, जिने चढताना- उतरताना दम लागतो. या समस्येकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करता कामा नये अनेकदा घश्यात जळजळ सुद्धा होत असते. काहीही खाताना जळजळीचा सामना करावा लागतो. काहीही खाल्यानंतर अशी समस्या जाणवत असेल तर हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं. याशिवाय  काहीही खाल्यानंतर चालण्या फिरण्यास त्रास होणं, छातीत जळजळणं यामुळे हार्टचे इतर आजार उद्भवण्याची शक्यता असते.

चक्कर, उलटी, पोटाच्या समस्या उद्भवतात. सगळ्यात महत्वाचं लक्षणं म्हणजे विकनेस, थकवा खूप जाणवतो. या लक्षणांव्यतिरिक्त काही लोकांना डावा हात दुखण्याची समस्या उद्भवते. साधारणपणे चालताना ही समस्या वाढते. जर एखाद्या व्यक्तीला खूप जास्त खोकला कफची समस्या असून हाता-पायांना सूज येत असेल तर गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. ( हे पण वाचा-कोरोनाला घाबरण्याआधी इन्फेक्शनचा धोका कोणाला जास्त असू शकतो, जाणून घ्या)

अनेकाना कोणतेही शारीरिक श्रमाचे काम न करता घाम येण्याची समस्या जाणवते. महिलांमध्ये आणि पुरूषांमध्ये हार्ट अटॅकची कारणं वेगवेगळी असतात. मादक पदार्थांचे सेवन, लठ्ठपणा, आनुवांशिकता ही कारणं हार्ट अटॅकची असू शकतात. अशी लक्षणं दिसत असल्यास वेळीच तज्ञांशी संपर्क करून तपासणी करून घ्या. हे पण वाचा-Coronavirus : कोरोना व्हायरस इम्यून सिस्टीमला कन्फ्यूज करतो आणि सुरू होतं जीवन-मृत्यूचं 'युद्ध'!)

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्स