सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतं. सतत कोणत्यातरी कामात किंवा एखादी एक्टिव्हिटी करण्यात आपण बिझी असतो. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे काहीजण घरी असल्याचा फायदा घेत मनासारखा वर्कआऊट करत आहेत. तर काहीजण खूप आळसावले आहेत. आज आम्ही तुम्हाला एथेरोस्क्लेरोसिस या आजाराबाबत सांगणार आहोत. कारण आरोग्याची काळजी न घेतल्याने कमी वयातही या आजाराचा सामना करावा लागू शकतो.
एथेरोस्कलेरोसिस रक्तवाहिन्या आकुचंन पावतात. यामुळे कार्डिओवॅस्क्युलर आजार सुद्धा उद्भवू शकतात. त्यामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोकचा आजार होण्याची शक्यता असते. हृदयात ब्लॉकेज होईपर्यंत एथेरोस्कलेरोसिसची लक्षणं दिसून येत नाहीत. यामुळे छातीत दुखणं, डोक्याला रक्तपुरवढा कमी होणं, चक्कर येणं, उलटी येणं, हातापायांमध्ये कमकुवत वाटणं, बोलायला त्रास होणं, अचानक डोकेदुखी वाढणं या आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात.
कारणं
हाय कॉलेस्ट्रॉल,
हाय ब्लड प्रेशर,
सूज येणं,
आर्थरायटीस,
लठ्ठपणा,
मधूमेह,
धुम्रपान ,
व्यायामाची कमतरता,
अनुवांशिकता,
उपाय
जीवनशैलीत बदल करून वाढतं वजन तसंच वाढतं. कॉलेस्ट्रॉल नियंत्रणत ठेवून तुम्ही या आजारापासून लांब राहू शकता. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये ब्लड सर्क्यूलेशल व्यवस्थित होतं. गंभीर स्थितीत डॉक्टरांकडून औषध किंवा सर्जरी करण्याचा सल्ला दिला जातो. रक्ताच्या गुठळ्याा पडू नयेत. यासाठी रक्त पातळ करण्याच्या गोळ्या डॉक्टरांकडून या आजारासाठी दिल्या जातात. काहीवेळा बायपास सर्जरी करण्याची स्थिती सुद्धा उद्भवू शकते. या त्यासाठी थ्रॉम्बोलिटिक थेरपी, एंजियोप्लास्टी और एंडारटेरेटोमीचा वापर केला जातो. या आजारापासून लांब राहण्यासाठी या गोष्टींची काळजी घ्या.
आहारात सॅचुरेडेट फॅट आणि कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी ठेवा.
फॅट्फुल पदार्थाचं जास्त सेवन करू नका
आठवड्यातून कमीकमी १५० मिनिटं व्यायाम करा.
धुम्रपान करू नका.
ताण-तणावापासून लांब राहा.
लक्षणं दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क करा.
दिलासादायक! अखेर 'या' महिन्यात कोरोना विषाणूंची लस येणार, हजारो लोकांवर चाचणी होणार
पाणी पिऊनसुद्धा वाढवू शकता रोगप्रतिकारकशक्ती, जाणून घ्या योग्य पद्धत