बदलत्या जीवनशैलीमुळे डायबिटीसच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. डोळे, मुत्रपिंड, मेंदू या अवयवांसह पायांवरही डायबिटीसचा विपरित परिणाम होतो. ज्या व्यक्तीला डायबिटीस आहे, त्या व्यक्तीच्या पायास 'डायबेटिक फीट' (diabetic feet)असे म्हणतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासोबत पायांची विशेष काळजी घेणे देखील आवश्यक आहे.
नेमके काय होतेडायबेटिक फीट या विकारात पायाच्या संवेदना कमी होऊ लागतात. एरवी आपल्याला जखम झाली तर कळते. मात्र, संवेदना कमी झाल्यावर जखम झाली की, त्याबद्दल कळतच नाही. त्यामुळे ती अधिक चिघळते. कालांतराने अल्सर होऊन त्यातून पाणी निघू लागल्यावर जखमेची जाणीव होते. कधी कधी पायांमध्ये आग होऊ शकते, ती दीर्घकालापर्यंत राहू शकते.
कोणती लक्षणे जाणवतात?१) पाय सून्न किंवा बधीर होणे२) तळपायाची जळजळ होणे किंवा पायाला मुंग्या येणे३) पायांचा अथवा बोटांचा आकार बदलणे४) पायाची जखम बरी न होणे५) विविध जिवाणुंमुळे पायाच्या त्वचेला, नखांना जंतूसंसर्ग होणे
कारणे काय?दीर्घकालापासून असलेला आणि अनियंत्रित मधुमेह, त्यासोबत उच्चरक्तदाब आणि धुम्रपानाचे व्यसन, आणि वाढते वय यामुळे 'डायबेटिक फुट'चा धोका निर्माण होतो. पायाच्या संवेदना गेल्यानंतरही योग्य ती काळजी न घेतल्याने जखम झाल्यास डायबेटिक फुट विकारात गुंतागूंत र्निमाण होऊ शकते.
काय काळजी घ्यावी?
- पाय रोज स्वच्छा धुवा व कोरडे करा. खूप गरम अथवा खूप गार पाण्यात पाय बुडवून ठेवू नका.
- पायाची त्वचा मऊ ठेवा. पायांना पेट्रोलियम जेली किंवा क्रीम लावा.
- पायाची नखे नियमित काळजीपूर्वक कापा. नखे कापताना जखम होणार नाही याची काळजी घ्या.
- पायमोजे व योग्य चपला वापरा.अनवाणी चालू नका.
- धुम्रपान टाळा.
- नियमितपणे डॉक्टरांकडून पायांची तपासणी करून घ्या. पायाला काहीही त्रास होत असल्यास दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.