हर्निया हा आजार होतो तेव्हा शरीरातील मासपेशी किंवा टिश्यू बाहेर यायला सुरूवात होते. म्हणजे शरीराचा एखादा भाग जर सामान्यापेक्षा अधिक वाढला तर तो हर्निया आहे. या आजाराची लक्षणं पोटात दिसून येतात. ही समस्या बेबी, कंबर आणि आसपासच्या भागात उद्भवते. महिलांना आणि पुरुषांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. पण सर्वाधिक पुरूषांमध्ये हा आजार दिसून येतो. वयाच्या ५० वर्षाानंतर ही समस्या जास्त जाणवते. त्याला कॉनजेनायटल हार्निया असं म्हणतात. आज आम्ही तुम्हाला या आजाराची लक्षणं सांगणार आहोत.
कारणं
जन्मजात ही समस्या असणं
वाढत्या वयात हा आजार होणं
जखम किंवा सर्जरीमुळे
व्यायाम किंवा जास्त जड वजन उचलण्यामुळे
लठ्ठपणाचे शिकार असणं
हर्नियाची लक्षणं
पोटाच्या खालच्या बाजूला गाठ येते. झोपल्यानंतर या गाठीबाबत फारशी जाणीव होत नाही. पण खोकताना, वाकताना, उभं राहत असताना जास्त वेदना होतात. याशिवाय छातीत जळजळ होणं, अन्न गिळण्यासाठी त्रास होणं ही लक्षणं दिसून येतात. सूज आलेल्या जागेवर तीव्र वेदना, लघवी करताना वेदना होणं.
अशी घ्या काळजी
वजन वाढू देऊ नका. वजन वाढल्यास तुमची समस्या अधिक वाढू शकते. जर तुमचं वजन जास्त असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या.
प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा.
आरामदायक अंडरगारमेंट्सचा वापर करा.
पोटाच्या मांसपेशींवर अधिक दबाव टाकणारी कामं करु नका.
पोटाची आणि अपचनाची समस्या वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
CoronaVirus : ... म्हणून कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या कमी; CDC चा दावा
कोरोनाशी लढण्यासाठी फुफ्फुस चांगली असणं आवश्यक; 'या' ५ मिनिटांच्या व्यायामाने राहा निरोगी