मानवी शरीरात किडनीची खूप महत्वाची भूमिका असते, परंतु जेव्हा मूत्रपिंडात द्रवपदार्थाचे प्रमाण कमी होऊ लागते, तेव्हा कचरा साठण्याचे प्रमाण वाढू लागते, त्यानंतर कचरा शरीरातून बाहेर पडण्याऐवजी मूत्रपिंडात जमा होण्यास सुरवात होते. त्यानंतर, हा कचरा क्रिस्टल्सचे रूप घेतो ज्याला आपण किडनी स्टोन आणि मराठीत मुतखडा असे म्हणतो. मुतखडा झाल्याची काय लक्षणे असतात हे डॉ. नीतीन श्रीवास्तव यांनी ओन्लीमायहेल्थ या वेबासईटला दिलेल्या माहितीत नमुद केली आहेत.
ओटीपोटात वेदना होतातसामान्यतः मुतखडा झाल्याची लक्षणे दिसत नाहीत. परंतु, जेव्हा मूत्रमार्गात त्याची हालचाल होते किंवा अचानक अडथळा निर्माण होतो त्यावेळी तीव्र वेदना होतात. वेदना ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.
लघवीच्या वाटेतील संक्रमण किंवा यूटीआयकिडनी स्टोन झाल्याने लघवी च्या वाटेवर संसर्ग होतो. कारण कणांच्या निर्मितीमुळे, लघवी चा मार्ग अरुंद होतो, त्यानंतर लघवी करताना अडचण येते आणि ह्यामुळे किडनीला त्रास होतो. ह्या सगळ्यात मूत्रमार्गामध्ये बॅक्टेरिया सहज वाढू शकतात आणि यूटीआय होण्याची शक्यता देखील वाढते.
मळमळ आणि उलटी होणेकिडनी स्टोनमुळे बर्याच लोकांना मळमळ आणि उलट्या होतात पण हे प्रत्येकाला होत नाही. जेव्हा किडनी स्टोन (Gastrointestinal tract) जठार आतड्यातील नसावर आदळते तेव्हा हे होते . हे आपल्या पोटाला त्रास देते आणि मळमळ होऊ शकते. या व्यतिरिक्त, किडनी स्टोनमुळे पोटात जोरात दुखू शकते.वारंवार लघवीला जाणेबर्याच लोकांना वारंवार लघवी होत असेल तर ते त्याकडे दुर्लक्ष करतात. पण असे करणे त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते, किडनी स्टोन मूत्रमार्गाच्या खालच्या भागात पोहोचतो तेव्हा मूत्राशय पूर्णपणे रिकामं होत नाही, ज्यामुळे लघवी साचून वारंवार लघवीला होते.लघवी करताना वेदना होणेयूटीआयमुळे होणाऱ्या वेदनाप्रमाणेच किडनी स्टोन मुळे लघवी करताना जळजळ आणि वेदना होतात. याला डॉक्टरांच्या भाषेत डायसुरिया देखील म्हणतात. तुमच्या लघवीतून रक्त जाऊ शकते, जेव्हा असे होते तेव्हा तुम्हाला वेदना देखील होते. ह्याला हेमेट्युरिया म्हणतात. ह्याकडे दुर्लक्ष करु नका. लगेच डॉक्टरांना दाखवा.
किडनी स्टोनचे किडनीवर होणारे परिणामकिडनी निकामी होणे किंवा किडनी खराब होणे खरं तर, दुर्दैवाने,किडनी स्टोन मुळे किडनी निकामी होऊ शकते, तसेच स्टोन किडनीचे नुकसान देखील करतात. ज्याला किडनी फेल झाली असे लोक म्हणतात. यासह, यामुळे किडनीचे पण बरेच नुकसान होऊ शकते. चिंतेची बाब अशी आहे की हे कोणत्याही लक्षणांशिवाय उद्भवू शकते आणि अगदी रुग्णाला त्वरित उपचारांची आवश्यकता भासते. काही प्रकरणांमध्ये ते प्राणघातक देखील असू शकते.
मूत्रपिंडाचा संसर्गमूत्रपिंडातील किडनी स्टोनमुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, जेव्हा इन्फेक्शन होते तेव्हा ते लघवीच्या वाटेत देखील संक्रमित होऊ शकतात. ह्यात काय होते तर सर्दी होऊन खूप ताप येतो हे मूत्रपिंडाच्या संसर्गाचे पहिले लक्षण आहे. मूत्रपिंडाचा संसर्ग हा एक भयंकर रोग आहे जो कधीकधी जीवघेणा देखील ठरू शकतो.