( image credit- acupunturistaquito)
तरुण वयात सुरू झालेली मासिक पाळी थांबायची वेळ सगळ्याच महिलांच्या आयुष्यात येत असते. साधारणपणे वयाच्या चाळीशीनंतर हा काळ सुरू होतो. यानंतर स्त्री ची आई होण्याची क्षमता संपणार असते. याचवेळी स्त्रियांमध्ये मानसिक, शारीरिक बदल होत जातात. काही स्त्रियांच्या बाबतीत खूपच लवकर म्हणजे चाळीशीच्या आधीच मेनोपॉज येतो. याचं कारण म्हणजे काहीतरी शारीरिक बदल किंवा एखादी कॉम्प्लिकेटेड आजार यामागे असते. कधीकधी अंडाशयाचा कॅन्सर आणि त्यामुळे गर्भाशय काढून टाकण्याची वेळ येते नंतर त्याचे उपचार, केमोथेरपी या सगळ्यांचा परिणाम म्हणून रजोनिवृत्ती लवकर होते. आज आम्ही तुम्हाला पाळी बंद होण्याची लक्षणे सांगणार आहोत.
प्री मेनोपॉझ :
हा कालावधी मेनोपॉझ सुरू होण्याच्या कित्येक वर्ष आधीपासून चालू होतो यामध्ये बीजाशयात इस्ट्रोजन कमी तयार व्हायला सुरुवात होते. रक्तस्त्राव कमी होत राहतो आणि ही प्रक्रिया संपूर्ण पाळी बंद होईपर्यंत सुरूच राहते. शेवटच्या एक-दोन वर्षात इस्ट्रोजन लेवलची पातळी जास्त घसरते. बऱ्याच स्त्रियांना याची लक्षण दिसतात.
मेनोपॉझ :
सलग एकवर्ष मासिक पाळी येत नाही. या काळात बिजाशयानी बीज सोडणं आणि इस्ट्रोजन तयार करणे पूर्णपणे थांबवलेलं असतं.
पोस्ट मेनोपॉझ :
ही रजोनिवृत्तीनंतरची अवस्था असते. या काळात साधारणपणे दोन वर्ष मासिक पाळी येतच नाही आणि नंतर ती पूर्णच थांबते. काही काही स्त्रियांना अचानक घाम येणे अशी लक्षणे दिसतात. या काळात इस्ट्रोजन बनणे पूर्णपणे थांबलेले असते.
मेनोपॉझची लक्षण :
खूप जास्त आणि वेदनायुक्त रक्तस्त्राव होतो.
कधीकधी खूप कमी रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग होतं.
घाम येणं आणि जीव घाबराघुबरा होणं.
मासिक पाळी नियमित राहत नाही.
पुरेशी झोप न होणं.
निद्रानाशाचा विकार जडणं.
डोकेदुखी वाढणे.
उदास वाटणं.
सतत थकवा जाणवणं.
सांधेदुखी
वजायनात कोरडेपणा जाणवणे. ( हे पण वाचा-पोटाच्या चरबीमुळे शरीर बेढब दिसतय? 'या' उपायांनी लठ्ठपणा करा दूर)
पण आपण जर काहीसवयींमध्ये काही बदल केले तर मेनोपॉझ खूप आनंदाने घेता येऊ शकतो. त्यासाठी नियमितपणे योगा, व्यायाम करणे जेणेकरून पुरेशी झोप होईल आणि चिडचिड कमी होईल. तसंच हार्ट डिसीज, डायबिटीज आणि ऑस्टियोपोरोसिस यांसारख्या आजारांना रोखता येईल.
योनीमार्गातील कोरडेपणा घालवण्यासाठी काही क्रीम्स, मॉइश्चरायझर लावणे. शक्यतो धूम्रपान करूच नये कारण तंबाखूमुळे मेनोपॉज लवकर चालू होतो. आपल्या मित्र-मैत्रिणीं बरोबर जास्त वेळ घालवणे एखादा आपला छंद जोपासणे या सवयी तुम्ही स्वतःला लावल्या तर ताण येणार नाही मानसिक त्रासापासून सुटका मिळेल. ( हे पण वाचा-लसणाने ब्लड प्रेशर वाढण्याची समस्या होते का? वाचा काय सांगतात एक्सपर्ट्स...)