शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

फुड पॉयझनिंगची 'ही' लक्षणं वेळीच ओळखा अन्यथा झालेला असेल खूप उशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 4:16 PM

फूड पॉयझनिंग म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कशी असतात ते जाणून घेऊया.

आज ७ जून जगभरात 'जागतिक अन्न सुरक्षा दिन' साजरा केला जातो. अन्नातील धोके टाळणे, ते शोधणे आणि उपाय करण्यासाठी दरवर्षी जागतिक अन्न सुरक्षा दिवस साजरा केला जातो. आपण जे काही खात आहात ते स्वच्छ, ताजे आणि पौष्टिक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे दीर्घायुष्यासाठी आपले एकंदर आरोग्य चांगले राहील. आपण अन्नजन्य रोग, अन्न विषबाधा टाळू शकता. दरवर्षी एका खास थीम अंतर्गत लोकांचे लक्ष याकडे वेधले जाते, लोकांना जागरूक केले जाते. यंदाच्या 'जागतिक अन्न सुरक्षा दिना'ची थीम 'सुरक्षित अन्न, उत्तम आरोग्य' अशी आहे. म्हणजेच जेवढे सुरक्षित, स्वच्छ आणि आरोग्यदायी खाल तेवढे तुमचे आरोग्य चांगले राहील.

सर्व वयोगटातील लोकांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी. विशेषतः उन्हाळ्यात अन्नजन्य रोगांचा धोका जास्त असतो, ज्यामध्ये अन्न विषबाधा ही एक कॉमन समस्या आहे. फूड पॉयझनिंग म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कशी असतात ते जाणून घेऊया.

अन्नजन्य रोग म्हणजे काय?जेव्हा तुम्ही दूषित अन्न किंवा पाणी, द्रवपदार्थ सेवन करता तेव्हा अन्नजन्य रोग होतात. अनेक प्रकारचे रोग निर्माण करणारे सूक्ष्मजंतू किंवा रोगजनक अन्नपदार्थ दूषित करू शकतात, त्यामुळे विविध प्रकारचे अन्नजन्य आजार होऊ शकतात. बहुतेक अन्नजन्य रोग हे विविध जीवाणू, विषाणू आणि परजीवी यांच्यामुळे होणारे संक्रमण असतात. असुरक्षित खाद्यपदार्थांमुळे अनेक रोग होतात.

अन्न विषबाधा म्हणजे काय? हेल्थलाइनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, अन्नातून होणार्‍या आजारांना सामान्यतः अन्न विषबाधा म्हणतात. दूषित, खराब झालेले किंवा विषारी अन्न खाल्ल्याने असे होते. अन्न विषबाधेच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या आणि अतिसार यांचा समावेश होतो. दरवर्षी जगभरातील लाखो लोकांना कोणत्या ना कोणत्या अन्न विषबाधेचा त्रास होतो. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. अन्नातून विषबाधा झाल्यास काहीवेळा ते एका दिवसात बरे होऊ शकते, काहीवेळा यास 1 आठवड्यापासून 8 आठवडे देखील लागतात. काही प्रकरणे उपचाराशिवाय बरे होतात.

अन्न विषबाधेची लक्षणे -अन्न विषबाधा संसर्गाच्या स्त्रोतावर अवलंबून असल्याने लक्षणे देखील बदलू शकतात. अन्नातून विषबाधेच्या सामान्य प्रकरणांमध्ये खालील लक्षणे दिसतात-

  • ओटीपोटात दुखणे, पेटके
  • अतिसार
  • उलट्या, मळमळ
  • भूक न लागणे
  • अशक्त वाटणे
  • डोकेदुखी
  • अन्न विषबाधाची गंभीर लक्षणे खालीलप्रमाणे असू शकतात:
  • अतिसार जो 3 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकतो.
  • 102°F पेक्षा जास्त ताप आहे.
  • पाहण्यात किंवा बोलण्यात अडचण.
  • तोंड कोरडे पडण्यासह निर्जलीकरणाची गंभीर लक्षणे, लघवी कमी होणे.
  • लघवी करताना रक्त येणे.

अन्नातून विषबाधेवर उपचार -गंभीर लक्षणे दिसत नसल्यास या विषबाधेवर उपचार घरी देखील शक्य आहेत. यासाठी तुम्हाला स्वतःला हायड्रेट ठेवावे लागेल. इलेक्ट्रोलाइट्स समृद्ध स्पोर्ट्स ड्रिंक्स प्या. नारळ पाणी प्यायल्याने ताजी फळे, कार्बोहायड्रेट्स शरीरात राहतात आणि थकवा दूर होतो. या काळात कॅफिनचे सेवन टाळा. हर्बल चहा प्या, ज्यामध्ये कॅमोमाइल, पेपरमिंट, डँडेलियन औषधी वनस्पती असतील. हे सर्व खराब पोट, अस्वस्थ पचन सुधारण्यास मदत करतात. डॉक्टरांनी सांगितलेली औषधे योग्य वेळी घ्या. जुलाब, उलट्या झाल्यास स्वत: औषध घेऊ नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरी शिजवलेले हलके, पचण्याजोगे अन्न खा. दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, चीज, चरबीयुक्त पदार्थ, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, साखरयुक्त पदार्थ, अल्कोहोल, कॅफिन, शक्यतो खाऊ नका.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स