Salt Deficiency in Blood: मिठाशिवाय अनेक पदार्थ बेचव लागतात हे खरंच आहे. पण डॉक्टर नेहमीच मिठाचं सेवन कमी करण्यास सांगतात. वरून मीठ न खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. कारण जास्त मीठ खाल्लं तर हृदयरोग होण्याचा धोका अधिक असते. अशात जास्तीत जास्त लोकांना जास्त मीठ खाण्याचे नुकसान अलिकडे माहीत असतात. पण हेही तितकंच महत्वाचं आहे की, मीठ खूप कमी खाणंही मेंदुसाठी नुकसानकारक ठरू शकतं. अशात जाणून घेऊ रक्तात मिठाचं प्रमाण कमी झाल्याची लक्षणं.
कमी मिठामुळे होऊ शकतं नुकसान
मिठाच्या जास्त सेवनाने अनेक आजारांचा धोका असतो. हाय ब्लड प्रेशरचं हे एक फार मोठं कारण असतं. आहारातून मीठ खूप कमी करणं तुम्हाला महागात पडू शकतं. त्यामुळे असं अजिबात करू नका.
रक्तात कमी होईल मीठ
मिठामध्ये सोडिअम आणि क्लोराइड असतं. हे दोन्ही इलेक्ट्रोलाइट असतात जे अनेक कामे करतात. मीठ न खाल्ल्याने किंवा खूप कमी खाल्ल्याने रक्तात सोडिअमची लेव्हल कमी होते जी नुकसानकारक ठरू शकते.
सोडिअम कमी झालं तर होतो आजार
नॅशनल किडनी फाउंडेशनने सांगितलं की, जेव्हा रक्तात सोडिअमची लेव्हल प्रमाणापेक्षा जास्त कमी होते तेव्हा त्या स्थितीला हायपोनेट्रिमिया म्हणतात. या आजारामुळे शरीरात पाण्याचं प्रमाण वाढतं.
पाणी बॅलन्स ठेवतं सोडिअम
सोडिअममुळे शरीरात फ्लूइडची लेव्हल बॅलन्स राहते. सोडिअम कमी झालं तर फ्यूइडची लेव्हल वाढते आणि सेल्समध्ये सूज येते. याचा मेंदुला खूप धोका होऊ शकतो.
हायपोनेट्रिमियाची 8 लक्षण
मळमळ होणे, डोकेदुखी, मांसपेशींमध्ये कमजोरी, लो ब्लड प्रेशर, उभे राहिल्यावर चक्कर येणे, एनर्जी कमी होणे आणि थकवा जाणवणे, भूक न लागणे, अस्वस्थता किंवा राग येणे.
नॅशनल किडनी फाउंडेशननुसार, सोडिअमच्या कमतरतेचे काही संकेत खूप घातक असू शकतात. हे दिसल्यावर लगेच डॉक्टरांना भेटा. यात कन्फ्यूजन होणे, भ्रम होणे, बेशुद्ध पडणे, झटके येणं किंवा कोमात जाणे यांचा समावेश आहे.
जर मिठाचं सेवन कमी केल्याने सोडिअमची कमतरता झाली तर याचा उपचार बॅलन्समध्ये लपला आहे. जास्त मीठ खाणंही घातक आहे आणि कमी मीठ खाणंही नुकसानकारक आहे. डब्ल्यूएचओनुसार, एका दिवसात 5 ग्रॅम पेक्षा कमी मीठ खावं.