हिवाळ्यात बाळाची घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2016 4:17 PM
हिवाळ्यात मोठ्या व्यक्तिंबरोबरच लहान बाळांनाही त्वचेच्या व आरोग्याच्या समस्या उद्भवतात. मोठ्या व्यक्ती स्वत:ची काळजी घेण्यास सक्षम असतात, मात्र लहान बाळाचे तसे नाही. म्हणून हिवाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यावी याबाबत काही टिप्स देत आहोत.
हिवाळ्यात मोठ्या व्यक्तिंबरोबरच लहान बाळांनाही त्वचेच्या व आरोग्याच्या समस्या उद्भवतात. मोठ्या व्यक्ती स्वत:ची काळजी घेण्यास सक्षम असतात, मात्र लहान बाळाचे तसे नाही. म्हणून हिवाळ्यात बाळाची काळजी कशी घ्यावी याबाबत काही टिप्स देत आहोत. हिवाळ्यात बरीच मुले पाणी कमी प्रमाणात पितात. यामुळे डिहायड्रेशन आणि त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. मुलांना तहान लागली नसली तरी किंवा पिण्यासाठी पाणी मागितले नाही तरी त्यांना थोडे पाणी प्यायला द्यावे. या ऋतूत त्वचा रखरखीत होत असते म्हणून मुलांना अंघोळ घालण्यापूर्वी, त्यांच्या त्वचेवर खोबरेल तेल लावा. खोबरेल तेलात अँटिआॅक्सिडंट आणि जीवनसत्व असतात. यामुळे त्वचेत ओलावा राहून ती कोरडी पडत नाही. कडाक्याची थंडी असली तरी खूप गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा. मुलांना खूप गरम पाण्याने अंघोळ घातल्याने त्यांची त्वचा कोरडी पडण्याचा धोका असतो. यामुळे अंघोळीसाठी कोमट पाणी वापरलेले चांगले. रात्री झोपताना कोमट पाण्याने हातपाय, चेहरा स्वच्छ करुन त्यावर लोशन लावावे. तुम्ही ओठांवर तूप लाऊ शकता, यामुळे विपरित परिणाम होणार नाहीत. तसेच ओठ मुलायम होतील. याबरोबरच त्यांना संतुलित आहार देणे खूप महत्त्वाचे आहे