शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

कॅन्सर, कोरोनापेक्षाही सर्दी, खोकला त्रासदायक, वेळीच उपचार घ्या; नाही तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 10:26 AM

हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला अशा आजारांनी अनेकजण त्रस्त असतात

Health Tips : हिवाळ्यात होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला अशा आजारांनी अनेकजण त्रस्त असतात. हिवाळ्यात पडणारे धुके, प्रदूषण, थंडीचे वातावरण यांमुळे आजार आणखी बळावतात, पण या कारणांसह आणखी काही कारणांमुळेही हिवाळ्यात सर्दी खोकल्याचा त्रास होतो. वेळीच काळजी घेतली नाही तर कॅन्सर, कोरोनापेक्षाही सर्दी, खोकला अधिक तापदायक ठरू शकतो. 

कधी कधी सलग शिंका सुरू होतात, सुरुवातीला आपणही नाकात काहीतरी गेले असेल, धुळीचा त्रास झाला असेल असे समजून याकडे दुर्लक्ष करतो. आता थंडीच्या दिवसात तर वरच्या वर आपल्याला सर्दी, खोकला जाणवू शकतो. पण जर खूप दिवस होऊनही तुमची सर्दी काही केल्या बरी होत नसेल तर, मात्र सावध होण्याची गरज आहे. एक-दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ टिकणारी सर्दी ही साइनोसाइटसचे लक्षण असू शकते. सर्दीसह तुम्हाला ताप, खोकला व सतत थकवा जाणवत असेल तर, वेळीच लक्षणे तपासून घ्या. थंडीत हा त्रास बळावू शकतो आणि जर योग्य उपचार केला नाही तर स्थिती गंभीर होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

काय काळजी घ्याल? 

सकस आहार, नियमित व्यायाम, व्यसनापासून दूर राहा. अनेकजण आजार, दुखणे अंगावर काढतात. त्यातून आजार वाढू शकतो. सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार जिल्हा रुग्णालयात घेता येतात. त्यामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे, असे तज्ज्ञांनी सांगितले. 

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका :

 जर तुम्ही सर्दी आणि खोकल्याला हलक्यात घेत असाल तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. 

 कारण सर्दी, खोकला, घसादुखी, ताप, श्वास घेण्यास त्रास, मळमळ, डोकेदुखी ही कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. 

 अशी लक्षणे दिसताच तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधून  तुमची चाचणी करून घ्या.

गूळ आणि आले :

जर तुमचा सर्दी आणि खोकला औषध घेऊनही बरा होत नसेल. तर तुम्ही नियमितपणे आले आणि गूळ मिसळून सेवन करू शकता. हे कप काढून टाकण्यास मदत करेल. गूळ गरम करून वितळवून त्यात आल्याची पेस्ट मिक्स करून कोमट झाल्यावर खावी.

मध आणि आले :

मध आणि आले यांचे मिश्रण सर्दी, खोकला आणि घसादुखीवर जोरदार हल्ला करते. यासाठी एक आले बारीक करून त्यात मध मिसळा. दिवसातून ३ ते ४ वेळा याचे सेवन केल्यास खोकल्यापासून आराम मिळेल.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स