शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर तो व्हिडिओ व्हायरल करु नका”; मनोज जरांगेंनी केली विनंती, पाटलांना कशाची भीती?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :राहुल गांधींना वीर सावरकरांसाठी काही बोलण्यास सांगू शकता का? अमित शाहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
खलिस्तानी दहशतवादी अर्श दलाला कॅनडा पोलिसांच्या ताब्यात; पंजाबमध्ये टार्गेट किलिंगमध्ये होता सहभाग
4
Maharashtra Election 2024: मतविभाजनाचा फंडा 'सेम टू सेम', कुणाचा बिघडवणार 'गेम'!
5
Maharashtra Election 2024: खरगेंच्या पक्षाने महाराष्ट्राला लुटलंय; बावनकुळेंचा काँग्रेसवर हल्ला
6
भीषण! गाझामधील शाळा-रुग्णालयावर IDF चा मोठा हवाई हल्ला; २४ तासांत ४७ जणांचा मृत्यू
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मी म्हातारा झालो नाही, सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही'; शरद पवारांचा निर्धार
8
बाप रे बाप...! हा शेअर आहे की पैसा छापायचं मशीन? 4 महिन्यांत ₹1000 चे केले ₹9 कोटी! दिला 94,16,329% परतावा
9
शेतकरी अन् महिलांवर फोकस; पाहा भाजप आणि मविआच्या जाहीरनाम्यातील प्रमुख आश्वासने
10
“पंतप्रधान नरेंद्र मोदी जोपर्यंत येत राहतील, तोपर्यंत महाराष्ट्र अनसेफ राहील”: संजय राऊत
11
Sara Ali Khan : "पैसे असतील तर तो मला घेऊन जाऊ शकतो"; सारा अली खानने असं कोणासाठी अन् का म्हटलं?
12
"अजित पवारांची दादागिरी नही चलेगी नही चलेगी", आव्हाडांकडून गंभीर आरोप
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : धनंजय महाडिकांना धक्का! आक्षेपार्ह विधानाबाबत निवडणूक विभागाकडून नोटीस
14
Maharashtra Election 2024: ठाकरे विरुद्ध शिंदे... विदर्भात कोणत्या शिवसेनेची डरकाळी? समजून घ्या गणित
15
“महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी, मविआचे सरकार आणा”: मल्लिकार्जुन खरगे
16
देशातील सर्वात श्रीमंत IAS अधिकारी, पगार फक्त 1 रुपये; कोण आहेत अमित कटारिया? पाहा...
17
जयश्री पाटील यांची बंडखोरी अन् उमेदवारी, विशाल पाटील-विश्वजित कदम आमनेसामने; कोण बाजी मारेल?
18
“मोदीसाहेब भाषणे देण्यात हुशार, पण शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकणार नाही”: शरद पवार
19
विराट कोहली रिकी पाँटिंगचा सर्वात मोठा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर, कसोटी मालिकेत इतिहास रचणार?
20
Video - दे दणादण! बसमध्ये कंडक्टर-प्रवाशामध्ये तुफान राडा; लाथाबुक्क्यांनी केली मारहाण

पावसाळ्यात पाय सांभाळा, नाहीतर...

By admin | Published: May 30, 2017 5:33 PM

पावसाळ्यात पायांची काळजी घेतली नाही तर पायांचं दुखणं मागे लागू शकतं!

- नितांत महाजन‘आपके पांव देखे, बहौत हसीं है, इन्हे जमीं पर मत उतारना, मैले हो जाएंगे’ असं आपल्याला कुणी म्हणो ना म्हणो निदान असं तरी म्हणू नये की, आपके पांव देखे बहौत गंधे है, इन्हे कभी पानी तो लगाए..! असं होतं अनेकदा कारण आपण आपल्या पायांकडे फारसं लक्ष देत नाही, आणि पावसाळ्यात तर नाहीच नाही. आता पावसाळा जवळ येवून ठेपलेला असताना याची काळजी घ्यायला हवी की दरवर्षी आपण पावसाळ्यात ज्या चूका करतो निदान त्या तरी यंदा करू नयेत. कारण प्रत्येक पावसाळयात आपण त्याच चूका करत राहिलो तर पायांच्या व्याधी आपल्यामागे लागू शकतात. अनेकांची पायदुखी पावसाळ्यात डोकं वर काढते. पायाला इन्फेक्शन, बोटांत जखमा, टाचदुखी, पायांवर रॅश असे अनेक आजार या काळात होतात. याची कारणं जितकं बाह्य असतात तितकीच किंवा त्याहून अधिक आपला हलगर्जीपणा कारणीभूत असतो. यंदा चपला घेण्यापासूनच आपल्या चूका सुधारायला सुरुवात करू. म्हणजे पावसाळी पायदुखी टाळता येवू शकेल.त्यासाठी या काही गोष्टी करता येतील.

 

* पावसाळी रबरी चपला घेवू नका. तुम्ही दिवसभरात खूप चालत असाल तर त्यानं पायदुखी, टाचदुखी सुरु होवू शकते.

* चांगल्या दर्जाच्या वॉटरप्रूफ चपला विकत घ्या. तुम्ही जास्त फिरतीचं, चालण्याचं काम करत असाल तर चांगल्या चपला आणि बूट ही तुमची गरज आहे. किंवा खरंतर गुंतवणूकच आहे.

*  प्लॅट, सपाट चपला अजिबात घेवू नका. बायका ज्या रबरी सपाट चपला वापरतात त्या तर अजिबात वापरू नयेत.* आपण जी चप्पल घेवू तिला किमान एक ते दीड सेण्टीमिटरचं हील हवं. त्यानं टाचेला सपोर्ट मिळतो आणि शरीराचा तोल चांगला सांभाळला जातो.* पावसाळ्यात हील्स मात्र वापरू नका.

* अत्यंत तकलादू बेल्टची सॅण्डल कधीही वापरू नका. त्या तकलादू पट्टीवर आपल्या शरीराचा तोल अवलंबून असतो, त्यानं पाय घसरू शकतो. जाड बेल्ट किंवा अनेक बेल्ट असलेली चप्पल घ्या.

*  बाहेरुन आल्यावर आपण पाय धुतोच पण पावसाळ्यात गरम पाण्यात मीठ किंवा हॅण्डवॉश टाकून जरा वेळ पाय बुडवून ठेवावेत.*  रोज रात्री झोपताना पायांना, पाऊलांना, तळपायाला मॉइश्चरायझर आवश्य लावावं.*  टाचेकडे लक्ष द्या, टाच अती टणक होत असेल, किंवा भेगा पडत असतील तर डॉक्टरला दाखवा.*  खूप वेळ पाण्यात चालला असाल तर लगेच पाय धुवू नका. पाय कोरडे करा, शक्य तर शेका. त्वचा नॉर्मल झाली की पाण्यात पाय घाला, नाहीतर बॉडी टेम्परेचरवर त्याचा परिणाम होतो.* पावसाळ्यात पोटऱ्या, बोटं दुखत असतील, वाकडे होत असतील तर त्वरित डॉक्टरला दाखवा. अन्यथा वाताचा विकार वाढू शकतो.

(पावसाळी रबरी चपला घेताय? सावधान...)