बाळाची त्वचा निरोगी असावी, असं प्रत्येक आईला वाटत असतं. त्यासाठी आई बऱ्याचदा चांगल्या उत्पादनांचा शोध घेत असते. बाजारात अनेक स्वस्त आणि तितक्याच निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांचा भडिमार असतो. त्यामुळे बाळाच्या त्वचेला कोणताही अपाय न होता सूट होणारी उत्पादन वापरणं ही आपली जबाबदारी आहे. लहान बाळाची त्वचा ही एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या तुलनेत एकदम तुकतुकीत आणि मऊ असते. त्याची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असते. त्यामुळे लहान बाळाची त्वचा निरोगी राखण्यासाठी बाजारातून उत्पादनं खरेदी करताना काही गोष्टींची माहिती घेणं आवश्यक असतं.
जाणून घ्या, किती प्रमाणात वापरले जातात घटक
तुम्ही जेव्हा लहान बाळासाठी एखादं उत्पादन खरेदी करता जसे की, बेबी पावडर, बेबी साबण तेव्हा त्यामध्ये किती प्रमाणात कोणत्या घटकांचं मिश्रण आहे हे उत्पादनाच्या बॉक्सवर दिलेलं असतं. त्यामुळे आपल्या बाळाच्या त्वचेला पूरक असे घटक उत्पादनात आहेत की नाही, याची खात्री करूनच कोणतंही उत्पादन विकत घ्यावं. बऱ्याचदा माता या बाळासाठी एखादा साबण किंवा पावडर खरेदी करताना काही गोष्टींचा आवर्जून विचार करतात. आपल्या बाळाच्या त्वचेसाठी काय गरजेचं आहे, त्यासाठी हल्ली मातासुद्धा आग्रही असतात. अशांसाठी जॉन्सनची उत्पादनं फायदेशीर ठरतात. कारण त्या उत्पादनात पराबेन, सल्फेट्स आणि इतर अनावश्यक घटक नसतात.
अॅलर्जी होणारी उत्पादन वापरू नका!
बऱ्याचदा डॉक्टरसुद्धा अनावश्यक घटक असलेली उत्पादनं वापरू नका, असा सल्ला देतात. बाळाच्या त्वचेला अॅलर्जी असलेली उत्पादन वापरल्यास अंगावर चट्टे येणे किंवा पुरळ येण्यासारखी लक्षणं दिसू लागतात. त्यामुळे अशी उत्पादन वापरणं तात्काळ थांबवून आपल्या डॉक्टरचा तातडीनं सल्ला घ्या. इतर उत्पादनांच्या तुलनेत जॉन्सनची उत्पादनं ही सुरक्षित असून, पाच टप्प्यात सुरक्षा चाचण्या केल्यानं ती बाजारात उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे ती एकदम निरोगी असतात. त्यातून बाळाला कोणतीही अॅलर्जी किंवा अपाय होत नाही.
उत्पादने निश्चित मानकांनुसार असावीत
बाळाची निरोगी आणि कोमल त्वचा पाहता कोणतीही उत्पादनं खरेदी करताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानकं एकदा तपासून घ्यावीत. अशी उत्पादन खरेदी करण्यापूर्वी कृपया ते किती राष्ट्रीय व ग्लोबल नियामक मापदंडांवर खरी उतरली आहेत, त्याची एकदा चाचपणी करून पाहावी. तसेच त्या उत्पादनांनी किती चाचण्यांचे परीक्षण उत्तीर्ण केलं आहे हेसुद्धा एकदा पाहून घ्यावे.
सुगंधी पावडर वापरणं आवश्यक
नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाची गंध भावनेची क्षमता उत्तम असते. त्यामुळे बाळाला आनंदी ठेवण्यासाठी सुगंध असलेली पावडर फायदेशीर ठरते. तसेच सौम्य आणि हलकी सुगंध असलेली उत्पादनं वापरल्यास बाळाचा बौद्धिक विकास होतो. परंतु उग्र सुगंध हा बाळासाठी हानिकारकही ठरू शकतो. त्यामुळे बाळासाठी वापरण्यात येणाऱ्या उत्पादनांच्या सुगंधाचे प्रमाणही निर्धारित केलेले असावे. सौम्य गुणधर्म असलेल्या उत्पादनांनी लहान मुलांना कोणताही त्रास होत नाही. जॉन्सनची उत्पादनसुद्धा सौम्य गुणधर्माची आहेत.
उत्पादनाची सौम्यता वैद्यकीय प्रमाणित केलेली असावी
बाजारात अनेक उत्पादनं असतात, परंतु त्यातील काही उत्पादनांची योग्य पद्धतीनं वैद्यकीय चाचणी झालेली नसते. बाळाच्या वेगवेगळ्या अंगांसाठी वेगळी उत्पादनं वापरण्यात येतात. परंतु त्यासाठी ती वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित झालेली आहेत का, ये तपासून पाहणं नितांत गरजेचं आहे. जॉन्सनची उत्पादनं ही 100 टक्के प्रमाणित केलेली असल्यानं लहान बाळासांठी ती वापरल्यास कोणताही अपाय होत नाही.