पावसाळ्यात आपल्याला अन्न, पाणी आणि डासांमुळे अनेक आजार होउ शकतात. यामध्ये तीव्र गॅस्ट्रोएन्टेरिटिस, टायफॉयड, लेप्टोस्पायरोस,कावीळ, डेंग्यू आणि मलेरिया इत्यादी यांचाही समावेश आहे.
असं का आहे?
- मान्सूनमध्ये विशेषतः भारतात इतर मोसमांपेक्षा व्हायरस, बॅक्टेरिया आणि इतर संसर्ग होण्याचा धोका दोन पट जास्त असतो.
- हवेतील उच्च आर्द्रता आणि तापमान हानिकारक सूक्ष्मजीव वाढण्यास सक्षम करते, परिणामी बऱ्याच रोगांचे संक्रमण होते.
- या हंगामात, मलनिः सारण पाईप्स मधील अडथळा आणि ओव्हरफ्लो, पिण्याचे पाणीपुरवठा दूषित करण्याचे प्रमुख स्त्रोत आहे.
- मान्सून हा डासांचा प्रजनन काळ आणि डासांद्वारे होणा-या आजारांसाठी शिखर काळ असतो.
- तथापि, या महिन्यांमध्ये निरोगी राहणे, अगदी योग्य वेळी योग्य खबरदारीच्या उपाययोजना करण्यासारखेच सोपे आहे.
ते टाळण्यासाठी येथे काही टिप्स आहेतः
- नेहमी पाणी उकळून घ्यावे आणि फळ किंवा भाज्या वापर्ण्यापूर्वी धुवाव्यात
- आपले अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवा आणि बाहेरच्या अन्नाचा वापर टाळा
- वैयक्तिक आणि पर्यावरणीय स्वच्छता कायम राखली जाईल याची खात्री करुन घ्या (या हंगामात आपल्यासोबत नेहमी हँड सॅनिटायझर ठेवा किंवा आपले हात वारंवार धुवा)
- आपल्या परिसरातील मोकळे नाले आणि खड्डे बुजवलेले असल्याची खात्री करा
- आपल्या मुलांचे लसीकरण करुन घ्या, ज़र त्यांनी लस घेतली नसल्यास
- जर काही कारणास्तव आपण बाहेरचे खाणे टाळू शकत नाही तर फक्त गरम खाद्यपदार्थ घेणे पसंत करा
- बाहेरील कोशिंबीरी, सलाद आणि चटणी ह्यासारख्या खाद्यपदार्थांचे सेवन टाळा
- सोललेली फळे खा जेणेकरुन जीवाणू सालींबरोबर निघून जातील
- शौचालय स्वच्छ ठेवा, शौचालय वापरण्यापूर्वी आणि नंतर हात चांगले धुवा
- पावसात योग्य पादत्राणे परिधान करा आणि पूरग्रस्त भागात चालल्यानंतर पाय धुवा आणि घरी आल्यावर नेहमी पाय धुवा.
- डास प्रतिकारक वापरा आणि बाहेर पडताना पूर्ण बाह्यांचे कपडे घाला
- आपल्या घरात डासांची जाळी (मच्छरदानी) वापरा
- घरात आणि आसपास कुठेही पाणी साचू देऊ नका किंवा गोळा होऊ देऊ नका
- घरातील स्वच्छता राखण्यासाठी आपले वॉशरूम नियमितपणे धुण्यास विसरू नका
- खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकून ठेवा, व्हायरल झाल्यास हे सभोवतालच्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही
- दर काही तासांनी कोमट पाणी प्या आणि उकळलेले पाणी स्वतः बरोबर ठेवा
- आपली घरे नेहमीच हवेशीर आहेत याची खात्री करा
- संतुलित आहार घ्या आणि आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवा.
सुरक्षित रहा आणि पावसाळ्याचा आनंद घ्या.
-डॉ. हकीम परदावाला, एमडी, विभाग प्रमुख - मेडिसिन, सैफी हॉस्पिटल, मुंबई.