बेड-टी घेताय? सावधान !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2016 4:14 PM
आपल्या देशात चहा पिण्याची सवयच आहे. गप्पा-गोष्टी करताना जर चहा घेतला नाही तर काहीतरी अपूर्ण वाटते. आपल्या देशाची सुमारे ८० ते ९० टक्के लोकसंख्या सकाळी उपाशीपोटी चहा पिणे पसंत करते. बेड-टीचे कल्चर फक्त शहरातच प्रचलित नव्हे तर गावागावातदेखील लोक सकाळची सुरुवात चहा पिऊनच करतात.
आपल्या देशात चहा पिण्याची सवयच आहे. गप्पा-गोष्टी करताना जर चहा घेतला नाही तर काहीतरी अपूर्ण वाटते. आपल्या देशाची सुमारे ८० ते ९० टक्के लोकसंख्या सकाळी उपाशीपोटी चहा पिणे पसंत करते. बेड-टीचे कल्चर फक्त शहरातच प्रचलित नव्हे तर गावागावातदेखील लोक सकाळची सुरुवात चहा पिऊनच करतात. मात्र, कदाचित आपणास हे माहित नसेल की ही सवय आपणास किती घातक आहे. तज्ज्ञांच्या मते चहात कॅफिन असते जे आपल्यात तरतरी तर आणतेच मात्र त्यासोबत गंभीर परिणामदेखील होतात. जर आपणास सकाळी उठून चहा पिण्याची सवय असेलच तर त्या अगोदर काहीतरी खा. जर आपल्याला जास्तच चहा पिण्याची सवय असेल तर आरोग्यासाठी खरच अपायकारक आहे. उपाशीपोटी चहा पिण्याचे धोके :* ब्लॅक टी पिल्याने वजन कमी होते असा समज आहे, मात्र ब्लॅक टी पिल्याने पोट फुलते आणि भूक लागत नाही. याच कारणाने वजन कमी होते. * उपाशीपोटी चहा पिल्याने पित्त रस बनण्याच्या क्रियेवर परिणाम होतो. या कारणाने उचकी लागते आणि ह्रदयावर दाब पडल्यासारखे वाटते. * उपाशीपोटी दुधाचा चहा पिल्याने लवकर थकवा जाणवतो. सोबतच मूड-स्विंगचा प्रॉब्लेमदेखील वाढतो. * वेळोवेळी गरम चहा पिल्याने धोका अधिक वाढतो, कारण आपण जेवढ्या वेळेस गरम चहा पिता तेवढ्या वेळेस साखरदेखील गरम होते आणि नेमका हाच धोका आहे. * उपाशीपोटी चहा पिल्याने अल्सर होण्याची शक्यता असते.