- मयूर पठाडेअंगावर टॅटू गोंदवण्याची आपल्याला भारी हौस असते. आजकाल तर त्याचं मोठं फॅडच आलं आहे. अनेक मोठमोठे सेलिब्रिटीही आपल्या अंगावर टॅटू गोंदवून त्याचं जाहीर प्रदर्शन करीत असतात. पण हे फारच घातक आहे आणि त्यामुळे कॅन्सरसारख्या आजारालाही तुम्हाला बळी पडावं लागू शकतं.यासंदर्भात नुकत्याच झालेल्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञांनी याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे.१- टॅटू गोंदवण्यासाठी जी निडल वापरली जाते, त्यातून झिरपणारी शाई थेट आपल्या शरीरात जाते. आपल्या त्वचेखाली ती साचून राहते. त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.२- या शाईमध्ये अनेक विषारी आणि घातक पदार्थ असतात. निकेल, क्रोमियम, मॅँगनिज, कोबाल्ट.. यासारखे विषारी पदार्थ आपल्या शरीरात गेल्यानं त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतोच. त्यामुळे कॅन्सरचा धोका खूप मोठ्या प्रमाणात वाढतो.३-आपल्या शरीरात जी रंगद्रव्यं टॅटूमुळे जातात, ती कायमची शरीरात ठाण मांडून बसतात. टॅटू दिसायला वरुन कितीही छान दिसत असले तरीही त्याचे दुष्परिणाम नंतर आपल्याला भोगावे लागू शकतात.४- त्यातूनही आपल्या शरीरावर आपल्याला टॅटू गोंदवायचेच असतील आणि स्टाईल स्टेटमेंट म्हणून आपल्यालाही मिरवायचं असेल, तर हे टॅटू आपण कोणाकडून, कुठे गोंदवतो यालाही खूपच महत्त्व आहे.५- रस्त्यावर किंवा आपल्याला माहीत नसलेल्या कुठल्याही ठिकाणी टॅटू गोंदवू नयेत. तीच ती निडल परत परत वापरणं तर अत्यंत घातक.६- त्यामुळे टॅटू गोंदवताना चांगल्या आणि माहितीतल्या पार्लरचीच निवड करा. निडल स्टर्लाइज्ड म्हणजे निर्जंतुकच असली पाहिजे आणि प्रत्येक वेळी नवीन निडल वापरणंही गरजेचं आहे.७- या गोष्टी जर पाळल्या तर त्यातल्या त्यात तुमचा धोका थोडा कमी होऊ शकतो, कारण शरीरात गेलेले विषारी पदार्थ तर तसेच राहतात. हे विषारी पदार्थ शरीरातून बाहेर काढण्यासाठी पुन्हा महागडी ट्रिटमेंट घ्यावी लागू शकते. ती प्रत्येक जण घेतंच असं नाही.
टॅटूची क्रेझ तुमच्या जिवावरही बेतू शकते !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 2:37 PM
टॅटू गोंदवताना अनेक विषारी पदार्थ ठाण मांडून बसतात शरीरात..
ठळक मुद्देटॅटूची शाई थेट आपल्या शरीरात जाते. आपल्या त्वचेखाली ती साचून राहते. त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.निकेल, क्रोमियम, मॅँगनिज, कोबाल्ट.. यासारखे विषारी पदार्थ शरीरात गेल्यानं आरोग्यावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे कॅन्सरचा धोका खूप मोठ्या प्रमाणात वाढतो.आपल्या शरीरात जी रंगद्रव्यं टॅटूमुळे जातात, ती कायमची शरीरात ठाण मांडून बसतात.