शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
5
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
6
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
7
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
8
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
9
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
10
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
12
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
14
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
15
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
16
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
18
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
19
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
20
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान

नाश्त्याला चहा बरोबर चपाती खात असाल तर ही चूक करु नका, पडेल अशी महागात की...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 5:04 PM

आयुर्वेदातल्या विरुद्ध आहार (Opposite Foods) या प्रकरणात कशासोबत काय खाऊ नये, हे सांगितलेलं आहे. अशा पदार्थांमुळे पोषणमूल्यांचा (Nutrients) ऱ्हास होतो. तसंच गॅसेस, थकवा, मळमळ, पोट फुगणे अशा पचनासंदर्भातल्या तक्रारी निर्माण होतात.

कोरोनाकाळात घरी बसलेल्या बहुतांश जणांनी अन्नपदार्थ तयार करायला शिकायचा प्रयत्न केला. सध्या तर इतके नवनवीन पदार्थ व त्यांच्या रेसिपीज उपलब्ध झाल्या आहेत, की घरबसल्या कोणालाही ते करणं सहज शक्य होऊ शकतं. जिभेचे चोचले पुरवायला कोणाला नाही आवडत? पण हे करताना तब्येतीवर होणारा आहाराचा परिणाम विसरून चालत नाही. आयुर्वेदही हेच सांगतो. आयुर्वेदात काय खावं, किती खावं, कधी खावं याबाबत नियम सांगितले आहेत. कोणत्या पदार्थांसोबत काय खावं, किंवा खाऊ नये हेही सांगितलं आहे. आहारतज्ज्ञही तेच सांगतात. 'हिंदुस्तान टाइम्स'ने याबाबत माहिती देणाकं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

आयुर्वेदातल्या विरुद्ध आहार (Opposite Foods) या प्रकरणात कशासोबत काय खाऊ नये, हे सांगितलेलं आहे. अशा पदार्थांमुळे पोषणमूल्यांचा (Nutrients) ऱ्हास होतो. तसंच गॅसेस, थकवा, मळमळ, पोट फुगणे अशा पचनासंदर्भातल्या तक्रारी निर्माण होतात.

कोबी-फ्लॉवर वर्गातल्या भाज्यांसोबत आयोडीन असलेल्या भाज्याकोबी, फ्लॉवर, लेट्यूस, ब्रोकोली अशा भाज्यांमधलं संयुगं आयोडीन शोषून घ्यायला बाधा आणतात. त्यामुळे थायरॉइड ग्रंथीवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे थायरॉइड संदर्भातला काही आजार असल्यास क्रुसिफेरस (Cruciferous) वर्गातल्या भाज्या अर्थात कोबी-फ्लॉवरसारख्या भाज्यांचं सेवन कमी करावं. तसंच मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि फोर्टिफाइड सॉल्ट यांच्यासोबत अशा भाज्यांचं सेवन करू नये.

क जीवनसत्त्व आणि दूधक जीवनसत्त्व (Vitamin C) असणारी पालकासारखी भाजी आणि संत्रं, लिंबू, प्लम, बेरी वर्गातली फळं यांच्यात आम्ल असतं. दुधामध्ये केसिन (Casein) नावाचं संयुग असतं. आधीच दूध पचायला जड असतं. त्यात जर ते क जीवनसत्त्व असलेल्या भाज्या किंवा फळांसोबत घेतलं, तर ते घट्ट होण्याची प्रक्रिया होते. यामुळे गॅसेस, छातीत जळजळ अशा तक्रारी सुरू होतात.

चहा आणि लोहयुक्त पदार्थअनेकांना चहासोबत पोळी खाण्याची सवय असते; मात्र ती चुकीची असल्याचं आहारतज्ज्ञ सांगतात. चहासोबत लोहयुक्त पदार्थ (Iron Rich Foods) खाल्ल्यानं चहातलं टॅनिन आणि ऑक्झॅलेट्स शरीरात शोषले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे चहासोबत धान्याचे पदार्थ, पालेभाज्या, नट्स (Nuts) खाऊ नयेत. उपाशीपोटी चहा घेणंही टाळावं.

आहारासोबत फळांचं सेवनफळं पचायला हलकी व सोपी असतात; मात्र जेवण पचायला वेळ लागतो. या विरुद्ध गुणधर्मांमुळे जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेचच फळं खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो. त्याचं कारण जेव्हा अन्न पचायला सुरुवात होते, तेव्हा तुम्ही खाल्लेली फळं पोटात तशीच राहतात व त्यामुळे आंबवण्याची (Fermatation) क्रिया होते.

नट्स भिजवल्याशिवाय खाऊ नयेतनट्समध्ये फायटिक आम्ल (Phytic Acid) नावाचं संयुग असतं. या संयुगामुळे नट्समधल्या कॅल्शिअम, आयर्न, झिंक या गोष्टी शरीरात शोषल्या जाऊ शकत नाहीत. बदाम, शेंगदाणे, अक्रोड, सोयाबीन, डाळी भिजवल्यानंतर त्यांच्यातलं आम्ल कमी होतं. त्यामुळे ते घटक अधिक पोषक ठरतात.

विरुद्ध आहार घेतल्यानं पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आहार सर्वसमावेशक आणि योग्य असावा, असं आपलं आहारशास्त्र सांगतं.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स