- मयूर पठाडेतुमची तब्येत जर उत्तम, ठणठणीत असेल, तर चांगलंच, पण तुम्ही नेहमी टेन्शनध्ये असाल, डायबेटिसनंही तुमचं शरीर पोखरलं जात असेल, हृदयाचा त्रास असेल, ब्लड प्रेशर छळत असेल.. तर त्याचं मूळ तुमच्या झोपेत असू शकतं!इस सब दर्द की जड तुम्हारे निंद में है.. असं समजायला काही हरकत नाही.यासंदर्भातलं विज्ञान सांगतं.. जे शास्त्रज्ञांनी प्रयोग करुन वेळोवेळी सिद्धही केलेलं आहे...ज्यावेळी तुम्ही कमी झोपता किंवा तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, त्यावेळी तुमच्या मेंदूलाही पुरेशी विश्रांती मिळत नाही. त्यामुळे तो थकलेलाच राहतो. हा थकलेला मेंदू पूर्ण क्षमतेनं काम करू शकत नाही आणि त्यामुळे तुम्हाला टेन्शन, नैराश्य येण्याचं प्रमाणही वाढतं. त्याचा अनेक अंगांनी विपरित परिणाम होतो.तुम्ही झोपत नाही, म्हणून तुमचा मेंदू झोपत नाही, त्याला विश्रांती मिळत नाही म्हणून तुम्ही सारखे टेन्शनमध्ये राहता. त्यामुळे तुमच्या शरीरात स्ट्रेस हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. हे वाढलेले स्ट्रेस हार्मोन्स तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया बिघडवते आणि त्यामुळे तुमचं वजनही वाढतं.. हे इतके सारे विकार शरीरात तयार झाल्यानंतर आपोआपच इतर विकारांनाही ते आमंत्रण देतात आणि तुमचं शरीर विकारांचं आगर बनतं.त्यामुळे एकामागोमाग एक असे आजार जेव्हा तुम्हाला घेरतात, तेव्हा तुम्हाला कळत नाही, आपल्या बाबतीत हे असं का होतंय? त्या त्या आजारांबाबत त्या त्या वेळी उपचार केले जातात. काही वेळा तात्पुरता फरक पडतो, पण मूळ कारण तसंच राहतं आणि तब्येतीत काहीच फरक पडत नाही.त्यामुळे जेव्हा तुम्हाला ही लक्षणं दिसायला लागतील, त्याच वेळी सावध व्हा आणि पहिल्यांदा आपल्या झोपेकडे लक्ष द्या..तुमच्या समस्येचं उत्तर कदाचित तुमच्याकडेच असेल आणि थोड्याशा प्रयत्नांनी तुम्ही तुमच्या या समस्यांवर मातही करू शकाल!..
टेन्शन, नैराश्य, डायबेटिस, लठ्ठपणा, वजनवाढ.. येतील तुमच्याकडे राहायला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 5:42 PM
सब दर्द की जड एकही.. काय आहे त्यावर उपाय?
ठळक मुद्देतुम्ही झोपत नाही, म्हणून तुमचा मेंदू झोपत नाही, त्याला विश्रांती मिळत नाही म्हणून तुम्ही सारखे टेन्शनमध्ये राहता.टेन्शनमुळे तुमच्या शरीरात स्ट्रेस हार्मोन्सचं प्रमाण वाढतं.वाढलेले स्ट्रेस हार्मोन्स तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया बिघडवते आणि त्यामुळे तुमचं वजनही वाढतं.. कालांतरानं तुमचं शरीर विकारांचं आगर बनतं.