भारताचे आरोग्य मंत्रालय, जागतिक आरोग्य संघटना आणि सीडीसीकडून वारंवार कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याासाठी जनजागृती केली जात आहे. कोरोनाच्या माहामारीत लक्षणं दिसत नसलेल्या कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने संक्रमण मोठ्या प्रमाणावर परसत आहे. ज्यांची रोगप्रतिकारकशक्ती कमी आहे अशा लोकांमध्ये कोरोनाचं संक्रमण वेगाने पसरत आहे.
जर तुमच्याघरातही एखादी व्यक्ती कोरोना पॉजिटिव्ह आली असेल त्या व्यक्तींमध्ये लक्षणं दिसून येत नसतील तर अशा व्यक्तीला कमीतकमी १० दिवस होम क्वारटांईन ठेवा. मागील १० दिवसात त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांनीही स्वतःला क्वारंनटाईन करायला हवं.सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार लॅब टेस्ट कोरोना पॉजिटीव्ह आल्यानंतर लोकांमध्ये या आजाराची लक्षणं दिसून न आल्यास १० दिवसांसाठी सेल्फ क्वारंटाईन करायला हवं. जेणेकरून इतर व्यक्तींमध्ये संक्रमण पसरणार नाही.
जर १० दिवसात शरीरात कोविड 19ची लक्षण जास्त प्रमाणात दिसून येत असतील तर पुन्हा एकदा तपासणी करायला हवी. नंतर केलेल्या तपासणीत जर कोरोनाशी लढत असलेल्या एंटीबॉडीज दिसून आल्या तर डॉक्टरांचा सल्ला घेत पूर्ण उपचार घ्यायला हवेत. कारण व्यक्तीच्या शरीरात कोरोनाच्या एंटीबॉडीज तयार झाल्यास व्हायरसने त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश केलेला असतो. काही वेळा रुग्णांमध्ये लक्षणं दिसतात तर काही वेळा दिसून येत नाहीत.
कोरोनाची टेस्ट पॉजिटिव्ह आल्यास डॉक्टर होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देतात. अशावेळी एका वेगळ्या खोलीत राहा. घरच्यांच्या संपर्कात जास्त येऊ नका. १० दिवस स्वतःची काम स्वतः करा. कोणाशीही जवळून संपर्क साधू नका.
या दरम्यान तुमच्या कुटुंबातील व्यक्तींकडून जेवणं, पाणी, काढा घेताना दरवाज्यातूनच द्यायला सांगा. सोशल डिस्टेंसिंगवर लक्ष ठेवा.
ताण तणावमुक्त राहण्यासाठी पुस्तकं वाचा, मेडीटेशन करा, व्यायाम करा.
या जीवघेण्या आजारावर मात करण्यासाठी मानसिकदृष्या बळकट राहण्याचा प्रयत्न करा. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचं वेळेवर सेवन करा.
त्वचेवरचे 'ते' डाग असू शकतात कोविड 19 चे लक्षणं; कोरोना संसर्ग झाल्यास जाणवतो असा त्रास
कोरोना विषाणूंचा रहस्यमय हल्ला; वेगवेगळं राहत असूनही ३५ दिवसात ५७ लोकांना कोरोनाची लागण