- नितांत महाजनपाठदुखी छळते. त्रस्त करते. हा अनुभव तसा आम. बायकांची पाठ तर सतत दुखतेच. बैठं काम करणाऱ्या पुरुषांनाही पाठदुखीचा त्रास अनेकदा असह्य होतो. हे सारं आपल्याचकडे होतं असं नाही तर ब्रिटनसारख्या प्रगत देशातही सध्या पाठदुखीनं त्रस्त अनेकजण आहेत. ब्रिटिश पेन सोसायटीनं केलेल्या अभ्यासानुसार साधारण २ कोटी ३० लाख लोक ब्रिटनमध्ये गंभीर पाठदुखीने त्रस्त आहेत.आणि मग या अभ्यासात असंही दिसून आलं की, हे लोक सतत त्यावर उपाय म्हणून पेनकिलर्स घेत राहतात. मात्र त्यानं तेवढ्यापुरता आराम पडतो, पुन्हा तेच. यावर अभ्यास करताना डॉक्टर्स असं सांगतात की, पाठदुखत असेल तर व्हिटॅमिन डी कमी असण्याची शक्यताच अधिक आहे. त्यामुळे व्हिटॅमिन डीच्या गोळ्या डॉक्टरच्या सल्लयानं घ्या. ब्रिटनमध्ये सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे लोकांना हे जीवनसत्व कमी मिळतं.आता हेच आपल्या सदंर्भात पहायचं तर, आपल्याकडे चिक्कार सूर्यप्रकाश असूनही डी जीवनसत्वाची कमतरता अनेकांमध्ये सर्रास दिसते. आणि आहार विहाराचं अज्ञान तर मोठंच. मग पाठ दुखणार नाही आणि हाडं कमकुवत होणार नाही तर काय?
पाठ दुखतेय? मग तुम्हाला एका महत्वाच्या व्हिटॅमिनची गरज आहे..
By admin | Published: May 27, 2017 3:59 PM