Body fat : वजन कमी करण्यासाठी बरेच लोक सकाळी गार्डनमध्ये फिरण्यासोबतच ट्रेडमीलवर धावण्याचा आधार घेताहेत. जेणेकरून त्यांना परफेक्ट बॉडी शेप मिळाला. पण काही लोकांकडे वेळ नसल्याने ते योगा क्लास किंवा जिमला जाऊ शकत नाहीत. अशात आम्ही अशा लोकांना एक अशी एक्सरसाइज सांगणार आहोत ज्यासाठी केवळ 7 मिनिटे लागतील आणि तुमचं वजनही कमी होईल.
1) स्टेपअप
जर तुम्हाला तुमचं वाढलेलं वजन सहजपणे घरीच कमी करायचं असेल तर रोज कमीत कमी 7 मिनिटे घरातील पायऱ्यांवर वर-खाली उतरा. याने तुमच्या शरीरातील चरबी वेगाने कमी होईल. पोट आणि पोटाखालील चरबी याने लवकर कमी करण्यास मदत मिळेल. तसेच याने तुमचा स्टॅमिनाही वाढेल.
2) एब्स क्रंच
ही एक्सरसाइज करूनही तुम्ही वजन कमी करू शकता. फक्त ही एक्सरसाइज करण्यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर सरळ झोपा. नंतर गुडघे फोल्ड करून चेहऱ्यापर्यंत आणा व चेहराही पुढे करा. असं तुम्ही 20 वेळा करा. याने तुमचं वजन वेगाने कमी होईल.
3) स्क्वाट
स्क्वाटच्या माध्यमातूनही तुम्ही वजन कमी करू शकता. याने तुमचं वजन वेगाने कमी होईल. यात तुम्हाला खुर्चीच्या पोजिशनमध्ये स्वत:ला फोल्ड करायचं आहे. यानेही तुमचं वजन वेगाने कमी होईल. या एक्सरसाइजने पोटाखालील वाढलेलं वजन वेगाने कमी होईल.
4) वॉल सीट एक्सरसाइज
वॉल सीट एक्सरसाइजने तुम्ही सहजपणे वजन कमी करू शकता. तुम्हाला 30 सेकंदासाठी या पोजिशनमध्ये स्वत:ला होल्ड करायचं आहे. वजन कमी करण्यासाठी ही एक सोपी एक्सरसाइज आहे.