शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: 'कशाला कोर्टात गेली?'; अजित पवार सुळेंवर भडकले; शरद पवारांनाही केला सवाल
2
देवेंद्र फडणवीसांविरोधात काँग्रेस वापरतेय कर्नाटकचा ब्रेन? सांगितली मविआची स्ट्रॅटेजी
3
मोठी बातमी: तपासणीदरम्यान पोलिसांच्या हाती मोठे घबाड; कारमध्ये सापडले २ कोटी रुपये!
4
हत्या झालेल्या पतीला मिळवून दिला न्याय, महिलेने आई-वडील आणि भावाला घडवली जन्मठेप
5
KKR चा 'भारी' डाव! श्रेयस अय्यरला रिटेन करणार नाही; फ्रँचायझीला होणार मोठा फायदा
6
"मनसुख हिरेनची हत्या होणार हे अनिल देशमुखांना आधीच माहिती होतं की नव्हतं?"
7
अजित दादांनी नवाब मलिकांना उमेदवारी दिल्याने फडणवीस नाराज, म्हणाले, 100 टक्के...
8
Explainer : एक विधान बारामतीच्या निवडणुकीचा रंग बदलणार? अजितदादा बोलून गेले, पवारांनी अचूक हेरले; आता...
9
एक बातमी आणि 'या' डिफेन्स कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; पोहोचला ₹१००० पार 
10
पूजा खेडकरचे वडील निवडणुकीला उभे राहिले; लोकसभेला मनोरमा पत्नी होती, विधानसभेला 'नाही' दाखविले
11
NOT FOR LONG... हिज्बुल्लाने नवा 'चीफ' जाहीर केला, इस्रायलने 'गेम' प्लॅन सांगून टाकला!
12
मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
13
जास्त सामान नेणाऱ्या प्रवाशांवर कारवाई, एक्स्प्रेससाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय
14
Maharashtra Election 2024: शिवसेना उमेदवार सुहास कांदेविरोधात गुन्हा दाखल
15
Maruti Suzuki Company Share : तब्बल १७ वर्षांनंतर मारुती सुझुकीची 'ही' कंपनी देणार बोनस शेअर्स, स्टॉकमध्ये मोठी तेजी
16
IPL 2025 : वॉशिंग्टन सुंदरचा 'भाव' लय वाढला; ताफ्यात घेण्यासाठी मुंबईसह तीन संघ उत्सुक
17
केळकरांच्या उमेदवारी अर्जावर विचारेंचा आक्षेप; ठाणे शहर मतदारसंघात ट्विस्ट येणार?
18
पंखा पाहिल्यावर भीती वाटते का?; अर्जुन कपूरही 'या' आजाराने त्रस्त, 'ही' आहेत लक्षणं
19
काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा
20
क्विक कॉमर्स कंपनी Blinkit वरून सोन्याचं नाणं खरेदी करणं पडलं महागात, झाला स्कॅम; प्रकरण काय?

जेवण केल्यावर फळं खाण्याची सवय ठरू शकते घातक, जाणून घ्या योग्य वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 10:16 AM

दिवसातील कोणत्याही विशेष वेळी फळं खाल्ल्याने शरीरावर याचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचा प्रभाव पडू शकतो. 

वेगवेगळी फळं आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण अनेक लोकांना हे माहीत नसतं की, कोणत्यावेळी फळं खाणे आपल्या शरीरासाठी प्रभावी आणि लाभदायक ठरतं. कोणत्याही वेळी फळं खाल्ल्याने व्यक्तीला पचनाची समस्या, पोटदुखी, अनिद्रा इतकेच नाही तर डायबिटीजसारखी गंभीर समस्याही होऊ शकते. एका अभ्यासात हे आढळून आले आहे की, दिवसातील कोणत्याही विशेष वेळी फळं खाल्ल्याने शरीरावर याचा सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारचा प्रभाव पडू शकतो. 

वजन वाढतं

काही फळं ही सकाळच्या वेळी खाल्ल्याने शरीराला लगेच आणि अतिरिक्त एनर्जी मिळते. तर काही फळं त्याचवेळी खाल्ल्याने शरीराला एनर्जी मिळत नाही. फळं खाण्याची योग्य वेळ यासाठी महत्त्वाची आहे. कारण फळांमध्ये कार्बोहायड्रेट असतात. जे सामान्यपणे ग्लूकोजमध्ये बदलून शरीराला ऊर्जा प्रदान करतात. पण हे ग्लूकोज जेव्हा शरीराकडून उपयोगात आणलं जात नाही, तेव्हा ते चरबीच्या रुपात जमा होतं. यामुळे वजन वाढण्यासोबतच इतरही समस्या निर्माण होतात. 

सकाळची वेळ योग्य

एक्सपर्टनुसार, फळं खाण्याची योग्य वेळ सकाळी असते. सकाळी रिकाम्यापोटी फळं खाल्ल्याने शरीराची पचनक्रिया फळातील ग्लूकोजचं वेगाने विघटन करतं. त्यामुळे शरीराला फळातील पोषक तत्त्वांचा फायदा होतो. फळांमधील पोषक तत्वांचा फायदा घ्यायचा असेल तर सकाळी फळं खावीत. 

जेवण केल्यावर लगेच खाऊ नका

आंबट फळांमध्ये अॅसिड असतं आणि दुपारी जेवणानंतर लगेच त्यांचं सेवन केल्याने काही लोकांना पचनासंबंधी समस्या होऊ शकतात. अॅसिडिटीमुळे अस्वस्थता, अपचन किंवा छातीत जळजळ होऊ शकते. खासकरून अॅसिड रिफ्लक्सने पीडित लोकांना असं करणं टाळलं पाहिजे.

हेल्दी स्नॅक्स

तुम्ही सकाळी वेगवेगळ्या फळांना एकत्र करुन स्नॅक्सच्या रुपातही खाऊ शकता. त्यासोबतच सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणादरम्यानच्या वेळेतही तुम्ही फळं खाऊ शकता. सकाळी नाश्त्यावेळी सफरचंद, पपई, कलिंगड किंवा किवी ही फळं खाऊ शकता.

सायंकाळीही होतो फायदा

सकाळ सोबतच दोन जेवणांच्या मधल्या वेळेतही फळं खाणं चांगलं मानलं जातं. कारण दोन जेवणांच्या मधल्या काळात पोट रिकामं असतं. अशावेळी पोटात वेगवेगळ्या प्रकारचे एंजाइम रिलीज होतात. याने पचनक्रियेला गती मिळते आणि फळांमध्ये असलेलं ग्लूकोज सहजपणे पचतं. तसेच शरीराला फायबर, मिनरल्स आणि इतरही पोषक तत्व मिळतात. तसेच सायंकाळीही फळं खाणं महत्त्वाचं ठरतं. 

वजन नियंत्रणात राहतं

दोन जेवणांच्या मधल्या वेळेत फळं खाणं यासाठीही चांगलं असतं, कारण याने व्यक्तीची भूक संपत नाही. तसेच फळं सहजपणे लवकर पचतात. या वेळेत फळं खाल्ल्याने व्यक्तीचं वजनही नियंत्रित राहतं आणि जाडेपणाची समस्याही होत नाही. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य