बहुतांश लोकांना सिगरेट पिण्याची सवय असतात. पुरुषांप्रमाणे आता महिलाही सिगरेट मोठ्या प्रमाणात ओढतात. सिगरेट हे शरीरासाठी हानीकारक असते अशा वारंवार सूचना देऊनही काहींचे व्यसन सुटत नाही. परंतु सिगरेटमुळे एका महिलेच्या हाताची झालेली अवस्था पाहून अंगावर काटा येईल. सध्या सोशल मीडियावर हा फोटो खूप व्हायरल होत आहे. त्यात सिगरेट प्यायल्याने महिलेच्या हातावरील बोटांवर त्याचा गंभीर परिणाम झाल्याचं दिसून येते. ज्यावर काहीच उपचार होणार नाहीत.
सुरुवातीला महिलेच्या बोटांचा रंग काळसर पडला त्यानंतर हाताची बोटांवर वाईट परिणाम झाला. ४८ वर्षीय या महिलेचे नाव मेलिंडा जानसेन असं आहे. ती दक्षिण आफ्रिकेत राहणारी आहे. महिलेनं सांगितले की, २०२१ ऑक्टोबरपासून तिच्या हाताच्या बोटांमध्ये बदल दिसू लागला. सुरुवातीला बदलत्या तापमानामुळे ही समस्या जाणवत असावी असा अंदाज महिलेने लावला. त्यानंतर हाताची बोटे विचित्र होऊ लागली तेव्हा तिला धक्का बसला. तिने तातडीने डॉक्टरांना याबाबत दाखवले.
जेव्हा महिलेच्या हाताची बोटे काळसर पडली. तेव्हा डॉक्टरांच्या तपासणीत जे सत्य बाहेर आले त्याने तिला धक्का बसला. स्मोकिंगच्या सवयीमुळे तिच्या बोटांवर हा परिणाम झाला होता. विशेष म्हणजे हा दुर्मिळ आजार आहे. ज्यात रक्ताच्या गाठी एकाच ठिकाणी जमा होता. त्यात सूज येते. मेलिंडाला जेव्हा कळालं हे सगळं तिच्या सिगरेट पिण्याच्या सवयीमुळे होत आहे. तेव्हा तिने सिगरेट सोडण्याचा निर्णय घेतला. वयाच्या १३ वर्षापासून मेलिंडा सिगरेट पिते. दिवसभरातून ती तब्बल १५ वेळा स्मोकिंग करत असते. तिच्या उजव्या हाताच्या बोटांवर हा गंभीर परिणाम झाला आहे.
मलिंडा म्हणाली की, सिगरेट पिण्यामुळे आता मला माझ्या हातांचा वापर करता येत नाही. मी जेवण बनवू शकत नाही. स्वच्छता करू शकत नाही. मला माझ्या हाताच्या बोटातील वेदनेतून मुक्त होता येत नाही. मी पर्सनल असिस्टेंट आणि क्वालिफाइढ नेल टेक्निशियन म्हणून काम करत होते. माझ्या कामामुळे माझी ओळख होती. परंतु आता मागील ऑक्टोबरपासून मला काहीच काम करता येत नाही. डॉक्टरांनीही यावर कुठलाच उपाय नसल्याचं सांगितले आहे. हा माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ आहे. या आजाराचा सामना मी हिंमतीनं करत आहे. त्यामुळे लोकांनी सिगरेट ओढू नये असा सल्ला मेलिंडा देत आहे. जेणेकरून दुसऱ्या कुणावर अशी वाईट वेळ येऊ नये.