देशातून कोरोना हद्दपार होण्याची वेळ आलेली असताना दिल्लीने सर्वांची झोप उडविली आहे. सुरुवातीपासून कहर करणाऱ्या केरळपेक्षाही रुग्णसंख्या अचानक वाढू लागली आहे. यामुळे युपी, हरियाणा, चंदीगड या शेजारील राज्यांनी नागरिकांना मास्कची सक्ती करण्यास सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारने गेल्याच महिन्यात आपत्ती प्रतिबंधक निर्बंध उठविले होते. यानंतर राज्यांनीही नागरिकांना सूट देत मास्क सक्ती शिथिल केली होती. या काळात चीन आणि शेजारील देशांमध्ये कोरोनाने हाहाकार सुरु केला होता. ब्रिटनमध्ये नवा व्हेरिअंट सापडला होता. चीन लॉकडाऊन असताना भारत मात्र मोकळा झाला होता. आता दिल्लीमध्ये रुग्णसंख्या वाढू लागली आहे.
सोमवारी दिल्लीत 501 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. दिल्लीत रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट हा ७.७२ टक्क्यांवर गेला आहे. दिल्लीमध्ये गेल्या २४ तासांत 6492 टेस्टिंग करण्यात आल्या होत्या. एवढ्या कमी चाचण्या असतानाही ५०० वर रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. रविवारी देखील 517 रुग्ण सापडले होते. दिलासा देणारी बाब म्हणजे कोरोनामुळे कोणाचा मृत्यू झालेला नाही. सोमवारी दिल्लीत २९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
दिल्लीमध्ये ४० रुग्ण ह़ॉस्पिटलमध्ये भरती झाले आहेत. याशिवाय एन्य ४१ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. एकूण ८१ रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.