सामान्यपणे सगळेच लोक भाज्या कापताना त्यांची साल कचरा म्हणून फेकून देतात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, भाज्यांच्या सालीचे आरोग्याला खूपसारे फायदे मिळतात. अनेक भाज्यांच्या सालींमध्ये पोषक तत्व भरपूर असतात. पण लोक कचरा समजून या साली फेकून देतात.
आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि शरीराला पोषक तत्व मिळाले म्हणून काही भाज्यांच्या साली खाल्ल्या पाहिजेत. जसे की, कारले, बटाटे, वांगी आणि गाजर इत्यादी. या भाज्यांच्या सालींमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स, पॉलीफेनॉल्स आणि इतर पोषक तत्व असतात. या सालींचे शरीराला काय फायदे होतात हे जाणून घेऊ.
बटाटे
बटाटाच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि आयर्न भरपूर असतं. त्याशिवाय बटाट्याच्या सालीमध्ये भरपूर फायबर असतं. जे बद्धकोष्ठता किंवा पोटांच्या समस्या दूर करतं.
गाजर
जर तुम्हाला गाजरामधील पोषक तत्व मिळवायचे असेल तर याची साल कधीच फेकू नका. याच्या सालीमध्ये बीटा-कॅरोटीन नावाचं तत्व असतं. जे शरीरात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी ची कमतरता भरून काढतं. त्याशिवाय यात फायटोन्यूट्रिएंट्स असतात. तसेच यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असतात.
वांगी
वांग्यांच्या सालीमध्ये व्हिटॅमिन के, अॅंटी-ऑक्सिडेंट, पोटॅशिअम आणि फायबर भरपूर असतं. वांग्याच्या सालीमध्ये भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. जे शरीराचा अनेक आजारांपासून बचाव करतात. तसेच वांग्याच्या सालीमध्ये पॉलीफेनॉल्सही आढळतं. जे कॅन्सरचा धोका कमी करतात.
दूधी भोपळा
केवळ दूधी भोपळाच नाही तर याची सालही खूप फायदेशीर असते. यात व्हिटॅमिन सी, फायबर आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. याच्या सेवनाने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात.
कारले
कारल्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. कारल्याच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर अॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे शरीराचा फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात आणि कोशिकांचाही बचाव करतात.