Disadvantages of Waking Up Late: पालकांना तुम्ही नेहमीच हे म्हणताना ऐकलं असेल की, सकाळी लवकर झोपेतून उठावं. जगतील अनेक बिझनेसमन सकाळी लवकर उठतात. उदाहरण द्यायचं तर ब्रिटनचे उद्योगपती रिसर्च ब्रान्सोन हे सकाळी पावणे सहा वाजता उठतात तर फिएट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सर्जियो मार्शियोन सकाळी साडे तीन वाजता उठतात. अॅप्पल कंपनीचे सीईओ टिम कुक पावणे चार वाजतात उठतात. हे लोक जीवनात यशाच्या शिखरावर आहेत. पण काय सकाळी लवकर उठल्याने त्यांना आयुष्यात यश मिळालं? झोपेतून उशीरा उठणाऱ्या लोकांचं करिअर जास्त यशस्वी नसतं का? सकाळी लवकर उठल्याने शरीराला काय नुकसान पोहोचतं? हा प्रश्न आहे. ज्याचं उत्तर आज आम्ही देणार आहोत.
सकाळी लवकर उठणारे जास्त यशस्वी होतात का?
असं अजिबात नाहीये की, जे लोक सकाळी लवकर झोपेतून उठतात ते उशीरा उठणाऱ्यांपेक्षा जास्त यशस्वी असतात. जग दोन भागात विभागलं आहे. एक ते लोक ज्यांना रात्री जागणं आवडतं. तर काही लोक असेही आहेत ज्यांना सकाळी लवकर उठणं आवडतं. साधारण एक चतुर्थांश लोकांना सकाळी झोपेतून लवकर उठणं आवडतं. तसेच तेवढेच लोक रात्री उशीरापर्यंत जागी राहणं पसंत करतात.
रिसर्चमधून समोर आलं आहे की, रात्री उशीरापर्यंत जागणारे त्यांच्या कल्पनाशक्तीबाबत पुढे असतात. त्यांना एकटं वेळ घालवणं जास्त आवडतं. तर सकाळी लवकर उठणाऱ्या लोकांचा स्वभाव सहकार्याचा असतो. ते कोणत्याही घटनेची योग्य समीक्षा करतात. सकाळी उठणारे लोक त्यांच्या आरोग्याची जास्त काळजी घेतात. ते डिप्रेशनचे कमी शिकार होतात. ते दारूही कमी पितात. रात्री उशीरापर्यंत जागणाऱ्यांची स्मरणशक्ती चांगली असते. ते नवीन प्रयोग करण्यासाठी मोकळे असतात. सोबतच सकाळी उठणाऱ्यांप्रमाणे बुद्धीमान, फीट आणि संपन्न असतात.
सकाळी लवकर उठण्याचे नुकसान?
जर कुणाला बॉडी क्लॉकच्या विरूद्ध सकाळी झोपेतून उठण्यासाठी किंवा रात्री जागण्यास सांगितलं तर याचा शरीरावर वाईट परिणाम होईल. शरीरासोबत जबरदस्ती करण्याचे परिणाम चांगले होते नाहीत. जर शरीराला ऑर्गेनिक पद्धतीने चालू दिलं तरच त्याचं परफॉर्मेंस चांगलं होतं. जर एखादी व्यक्ती रात्री उशीरापर्यंत जागत असेल आणि त्याला सकाळी लवकर उठण्यास सांगण्यात आलं तर त्याचं कामात मन लागणार नाही. त्याला आळस येत राहील आणि मेंदूचाही योग्यपणे वापर करू शकणार नाही. त्याची तब्येत खराब होण्यासोबतच लठ्ठपणाही वाढू शकतो.