शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

सावधान! ‘ब्रेन ट्यूमर’चा धोका महिलांना जास्त, ७१ टक्के ट्यूमर सौम्य; जाणून घ्या, लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 3:27 PM

ब्रेन ट्यूमर होण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये १६ टक्क्यांनी अधिक असते.

- सुमेध वाघमारे 

मेंदू आपल्या शरीराच्या कार्यावर नियंत्रण ठेवतो. परंतु ट्यूमरमुळे त्यात व्यत्यय येऊ शकतो. यामुळे लक्षणे दिसताच उपचार आवश्यक आहे. प्राथमिक ब्रेन ट्यूमर होण्याचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये १६ टक्क्यांनी अधिक असते. महिलांनी अधिक जागरूक असणे गरजेचे आहे. ८ जून हा दिवस जागतिक ब्रेन ट्यूमर दिन म्हणून पाळला जातो. 

असा समजून घ्या, ब्रेन ट्यूमर

ट्यूमर म्हणजे मेंदूच्या ऊतींमधील असामान्य पेशींची वाढ. यामुळे दृष्टी, बोलणे, हालचाल, विचार व भावना यात अडथळे येऊ शकतात. ब्रेन ट्यूमर कोणत्याही वयात होऊ शकतो. ४% प्रकरणे ट्यूमरच्या सर्व प्रकरणांपैकी  ० ते १४ वयोगटातील मुलांमध्ये आढळतासर्व ब्रेन ट्यूमरपैकी सुमारे ७१ टक्के ट्यूमर सौम्य असतात. ७५.७% ब्रेन ट्यूमर रुग्णांसाठी सरासरी जगण्याचा दर असतो.

ब्रेन ट्यूमरचे प्रकार 

सौम्य ट्यूमर - यात आक्रमक कर्करोगाच्या पेशी नसतात. बहुतेक प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेने काढून टाकल्यानंतर परत वाढत नाहीत.घातक ट्यूमर - कर्करोगाच्या पेशी असतात. त्या जवळच्या ऊतींमध्ये पसरतात आणि उपचारानंतर पुन्हा वाढू शकतात.प्राथमिक ट्यूमर - मेंदूच्या पेशींमध्ये गाठ होण्यास सुरुवात होते. हे मेंदूच्या किंवा मणक्याच्या इतर भागांमध्ये पसरू शकते.मेटास्टॅटिक किंवा दुय्यम ट्यूमर- हा घातक असतो. शरीराच्या दुसऱ्या भागातून आलेल्या कर्करोगाच्या पेशींपासून वाढतो.

लक्षणे 

ब्रेन ट्यूमरची लक्षणे त्याचे स्थान, आकार, वाढीचा दर व अवस्था यावर अवलंबून असतात.-डोकेदुखी, चालणे, बोलणे किंवा विचार करणे कठीण होणे- अशक्तपणा - चक्कर येणे- असामान्य हृदयाचे ठोके, श्वासोच्छवासाचा वेग वाढणे- दृष्टी समस्या निर्माण होणे- उलट्या होणे

उपचार पद्धती 

शस्त्रक्रिया - ट्यूमर शस्त्रक्रियेने काढतात.रेडिएशन थेरपी - रेडिएशनचा उच्च डोस कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी आणि ट्यूमर संकुचित करण्यास वापरला जातो.केमोथेरपी - कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी शक्तिशाली रसायने वापरतात.लक्ष्यित थेरपी ट्यूमर विरोधी औषधे.

महिलांमध्ये ५८ टक्के प्रमाण 

ब्रेन ट्यूमर होण्याचे प्रमाण महिलांमध्ये ५८ टक्के, तर पुरुषांमध्ये ४२ टक्के आहे. मेंदूत ट्यूमरचे निदान होणे घातक ठरू शकते आणि रुग्णाचे आयुष्य बदलू शकते.- डॉ. पलक जयस्वाल, न्युरोसर्जन, नागपूर 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स