वॉशिंग्टन : न्यूमोनियाच्या आजारात फुप्फुसांमध्ये जाऊन उपचार करू शकणारे मायक्रोरोबोट अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी विकसित केले आहेत. त्यामुळे या आजारावर अतिशय प्रभावी उपचार करणे शक्य होणार आहे.
यासंदर्भात केलेल्या प्रयोगात उंदरांच्या फुप्फुसात जाऊन मायक्रोरोबोटने दिलेल्या औषधामुळे न्यूमोनियाच्या विषाणूंचा नाश झाला. ज्या न्यूमोनियाग्रस्त उंदरांवर अशा प्रकारचे उपचार करण्यात आले नाहीत, ते आजार झाल्यापासून तीन दिवसांत मरण पावले. (वृत्तसंस्था)
मायक्रोरोबोट का प्रभावी?nफुप्फुसातील संसर्गाशी लढण्यात अधिक सक्षम.nन्यूमोनियामुळे फुप्फुसाला आलेली सूज कमी करतात. nस्यूडोमोनास एरुनिगोसा या विषाणूमुळे उंदरांना होणाऱ्या न्युमोनियावर उपचार यशस्वी. nमेकॅनिकल व्हेंटिलेशनवर असणाऱ्या रुग्णांना या विषाणूंमुळे न्यूमोनिया होण्याची शक्यता असते.
एका आठवड्यात बरेशास्त्रज्ञांनी उंदरांमध्ये विंडपाईपद्वारे टाकल्या गेलेल्या ट्युबमधून त्यांच्या फुप्फुसात मायक्रोरोबोट पाठविला. त्यानंतर सुमारे एक आठवड्याच्या उपचारांनंतर उंदीर पूर्णपणे बरे झाले. अँटीबायोटिक औषधे इंजेक्शनद्वारे देण्यापेक्षा रोबोटद्वारे दिलेले औषध अधिक परिणामकारक असल्याचे लक्षात आले.
असे होतात विषाणू नष्टलेल्या माहितीनुसार मायक्रोरोबोट विशिष्ट प्रकारच्या पेशींच्या घटकांपासून बनविण्यात आले असून, त्यांच्या पृष्ठभागावर विषाणूविरोधी औषधांचा अंश ठेवण्यात येतो. फुप्फुसात शिरकाव केल्यानंतर हे मायक्रोरोबोट आपल्याकडील औषध तिथे पसरवितात. त्या औषधाच्या माऱ्याने न्यूमोनियाचे विषाणू नष्ट होतात.