मिठाई, गोड पदार्थ किंवा आणखीही चविष्ट व्यंजने यात खरी चव आणतात ते म्हणजे ड्रायफ्रुट्स (Dry Fruit). बदाम, अक्रोड, मनुका, पिस्ते, काजू खाणं शरीरासाठी फायदेशीर आहे. यामुळे निरोगी राहण्यासाठी तज्ज्ञ सुकामेवा खाण्याचा सल्ला देतात. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही ड्रायफ्रुट खातात. मात्र प्रत्येकवेळीच ड्रायफ्रुट खाणं फायदेशीर ठरेलच असं नाही. बरेचदा याचे धोकेही संभवतात.
काय आहेत ड्रायफ्रुट खाण्याचे तोटे?
वजन वाढतंड्रायफ्रुट्स जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते. ड्राय फ्रूटमध्ये भरपूर कॅलरी असतात. काही जण ड्रायफ्रुट्स मुळात वजन वाढवण्यासाठीच खातात. त्यामुळे वजन जास्त असणाऱ्यांनी ड्रायफ्रूट्स जास्त खाणं टाळलं पाहिजे.
पोटाचे विकारविशेषत: उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्स जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटाचे आजार संभवतात. ड्रायफ्रुट्समुळे पचन संस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. ओटीपोटात दुखणं, वेदना, अपचन आणि जुलाब होऊ शकतात. त्यामुळे शक्य असल्यास उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्स खाणं टाळावं किंवा कमी प्रमाणात खावेत. उन्हाळ्यात जर खायचेच असतील तर ड्रायफ्रुट्स रात्रभर पाण्यात भिजत ठेवून खावेत.
नाकामधून रक्त येण्याची शक्यताड्रायफ्रुट्समध्ये मोठ्याप्रमाणात उर्जा असते त्यामुळे ते शरीरासाठी गरम पडू शकतात. उन्हाळ्यात वातावरणात उष्मा असतो त्यावेळी ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढवते. ज्यामुळे नाकातून रक्तस्त्राव होण्याचा धोका संभवतो. ज्यांना नाकातून रक्तस्त्राव होण्याचा त्रास होत असेल. त्यांनी उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्स खाणं टाळावं.
मुरुम आणि पुरळ वाढतातरोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसातही ड्रायफ्रुट्स खात असाल तर, त्यामुळे चेहऱ्यावर मुरुम व पुरळ येणं आदी त्रास संभवतात. त्यामुळे उन्हाळ्यात ड्रायफ्रुट्सऐवजी रसाळ फळे खाणं चांगलं.