शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
4
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
5
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
6
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
7
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
8
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
9
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
10
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
11
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
12
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
13
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
14
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
15
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
16
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
17
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
18
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
19
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
20
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?

Weight loss: जर अचानक झपाट्याने होत असेल वजन कमी तर आहे गंभीर आजारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 5:43 PM

अनेक गंभीर आजार झाल्यानंतरही वजन झपाट्याने कमी होऊ लागते. जाणून घेऊया असे कोणते आजार आहेत, ज्यामुळे आपले वजन झपाट्याने कमी होऊ शकते.

वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे वजन कमी होऊ लागले की त्यांना एक वेगळाच आनंद जाणवतो. याशिवाय ज्यांना वजन कमी करायचे नाही किंवा थोडे वजन कमी करायचे आहे, त्यांचे वजन अचानक कमी होऊ लागले तर ही चिंतेची बाब आहे. मात्र, अनेकजण या गोष्टीला फारसे गांभीर्याने घेत नाहीत. त्यांना असे वाटते की जलद वजन कमी होणे हे त्यांच्या नेहमीच्या जीवनातील थकवा आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे झालेले असू (Causes of sudden weight loss) शकते.

अचानक वजन कमी होणं, हे शरीरातील एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे जास्त वजन कमी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नये. काळजी न घेतल्यास शरीरात गंभीर आजार वाढण्याचा धोका जास्त असतो. TOI मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, अनेक गंभीर आजार झाल्यानंतरही वजन झपाट्याने कमी होऊ लागते. जाणून घेऊया असे कोणते आजार आहेत, ज्यामुळे आपले वजन झपाट्याने कमी होऊ शकते.

कर्करोग (Cancer) -जर आपल्या आहारात आणि दिनचर्येत कोणताही बदल होत नसेल, तरीही वजन झपाट्याने कमी होत असेल तर ते कर्करोगाचे लक्षणही असू शकते. तुम्हाला स्वतःमध्ये किंवा इतर कोणामध्ये अशी चिन्हे दिसली तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

थायरॉईड -थायरॉईड दोन प्रकारचे आहेत, बहुतेक लोकांना हे माहीत आहे. एक ज्यामध्ये वजन झपाट्याने वाढू लागते आणि दुसरे ज्यामध्ये वजन कमी होते. थायरॉईडचा थेट परिणाम चयापचयावर होतो. थायरॉईडमुळे जेव्हा शरीरातील चयापचय मंदावते तेव्हा वजन वाढू लागते. दुसरीकडे, जर चयापचय वेगवान होऊ लागले, तर वजन वेगाने कमी होऊ लागते. सतत कमी होत जाणाऱ्या वजनामुळे काही वेळा हृदयाचे ठोके वाढणे, स्ट्रेस आणि झोप न लागणे अशा समस्या देखील उद्भवू शकतात. ही सर्व हायपरथायरॉईडीझमची लक्षणे आहेत.

रूमेटाइड अर्थराइटिस -संधिवात हा सांधेदुखीशी संबंधित एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये शरीराची ऊर्जा जास्त खर्च होते, त्यामुळे वजन झपाट्याने कमी होऊ लागते. 30 ते 50 या वयोगटात संधिवात होण्याची शक्यता जास्त असते. जर कोणाला सांधेदुखीसह वजन कमी होण्याची समस्या येत असेल तर ते गांभीर्याने घ्या आणि लवकर डॉक्टरांना भेटा.

पोटाशी संबंधित समस्या -जर आपले आतडे (पोट) निरोगी नसेल, तर आपले वजन वाढण्यास काही तास लागू शकतात. कधीकधी, लॅक्टोज इनटॉलरेंस, सेलिआक आणि क्रॉन्समुळे (आतड्यांचा जळजळ) देखील वजन कमी होते. वास्तविक, अनेकवेळा आपण प्रथिने आणि इतर पोषक तत्वांनी युक्त असा आहार घेतो, असे असूनही पोटाच्या समस्यांमुळे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीरात शोषली जात नाहीत, त्यामुळे कुपोषणाची समस्या सुरू होते. अशा परिस्थितीत, डॉक्टर ग्लूटेनमुक्त आहार घेण्याचा सल्ला देतात.

मादक पदार्थांचे व्यसन -ज्या लोकांना मादक पदार्थांचे व्यसन आहे, त्यांचेही वजन झपाट्याने कमी होऊ शकते. वास्तविक, व्यसनाधीन लोक तासन्तास खाणे-पिणे विसरतात. नशेत असताना त्यांना काहीच आठवत नाही. नशेमुळे भूक लागत नाही आणि हळूहळू खाण्याची इच्छा होऊन भूक कमी होऊ लागते. त्यामुळे व्यसनाच्या आहारी जाणं मृत्यूला आमंत्रण आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स