सकाळच्या चांगल्या सवयी शरीरासाठी आणि मेंदुसाठी फार फायदेशीर असतात. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार, सकाळी रिकाम्या पोटी काही ड्रिंक पिऊन अनेक आजारांना दूर केलं जाऊ शकतं. हे ड्रिंक तयार करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी सहजपणे आपल्या घरातच मिळू शकतात. या ड्रिंकने शरीरातील जास्तीची उष्णता निघून जाण्यास मदत मिळते.
जास्त उष्णता असण्याचे नुकसान
शरीराची उष्णता वाढण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅंड प्रीवेंशननुसार, असं झाल्याने हीट स्ट्रोक, हीट एग्जॉशन आणि हीट क्रॅम्प होऊ शकतो. ज्यामुळे तुम्हाला ताप, जास्त घाम येणे, शरीरावर पुरळ येणे, शरीर उष्ण राहणे, ब्लड प्रेशर वाढणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ होणे, बेशुद्ध पडणे अशा लक्षणांचा सामना करावा लागतो.
या 3 ड्रिंक्सने करावी दिवसाची सुरूवात
शरीरातून उष्णता काढणारं ड्रिंक
न्यूट्रिशनिस्ट जूही कपूर यांच्यानुसार, 1 चमचा गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या रात्रभर एक ग्लास पाण्यात भिजवून ठेवा. हे पाणी सकाळी सेवन करा. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये कूलिंग तत्व असतात. जे शरीरातील उष्णता बॅलन्स करतात. हे प्यायल्याने ताप आणि इन्फ्लामेशसारखे बॉडी हीटचे लक्षण कमी होतात.
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खास ड्रिंक
रात्रभर एक ग्लास पाण्यात केसरचे 5 ते 8 धागे भिजवून ठेवा. सकाळी हे पाणी प्यावे. केसरमध्ये कॅराटेनोइड आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. हे नैसर्गिक तत्व त्वचा उजळण्यासाठी मदत करतात. तसेच हे ड्रिंक रोज प्याल तर स्मरणशक्तीही मजबूत होते.
कढीपत्ता पावडरचं पाणी
सकाळी एक ग्लास पाण्यात एक चमचा कढीपत्त्याचं पावडर मिक्स करून प्या. हे होममेड ड्रिंक तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत करतं. एक्सपर्टने सांगितलं की, या पानांमध्ये प्रोटीन, बीटा कॅरोटीन आणि अमिनो अॅसिड असतं. जे केस मजबूत करण्याचं काम करतं. या पानांचा वापर एनीमिया, डायबिटीय, अपचन, लठ्ठपणा, किडनीच्या उपचारातही केला जातो.