Bad Cholesterol symptoms in urine: आजकाल चुकीचा लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अनेकांना शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या होत आहे. शरीरात जर बॅड कोलेस्ट्रॉल वाढलं तर स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो. त्यामुळे याचं प्रमाण कमी ठेवणं फार महत्वाचं आहे. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक असेल तर धमण्या आणि नसा डॅमेज होऊ शकतात. बॅड कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये चिकटून बसतं. ज्यामुळे शरीरात रक्तपुरवठा योग्यपणे होत नाही. ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या होतात.
कोलेस्ट्रॉल वाढलं की, शरीर वेगवेगळे संकेत देणं सुरू करतं. हात-पायांमध्ये वेदना, पायांमध्ये आखडलेपणा, वेदना आणि डोळ्यांच्या आजूबाजूला पिवळे डाग ही हाय कोलेस्ट्रॉलची मुख्य लक्षणं आहेत. तसेच सकाळी टॉयलेटला गेल्यावरही तुम्हाला अशी काही लक्षणं दिसतील जे कोलेस्ट्रॉल वाढल्याचं कारण असतात. तुमच्या लघवीमधूनही तुम्हाला याचे काही संकेत मिळतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
लघवीचा रंग बदलणे
शरीरात कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढल्याने लघवीचा रंग डार्क होतो. सकाळी जर तुम्हाला लघवीचा रंग सामान्यापेक्षा जास्त डार्क दिसत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्याचं लक्षण असू शकतं.
लघवीमध्ये क्रिस्टल दिसणे
बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर तुमच्या लघवीमध्ये काच किंवा साखरेसारखे छोटे-छोटे क्रिस्टल दिसतात. असे क्रिस्टल कधी कधी निरोगी व्यक्तींच्या लघवीमध्येही दिसतात. पण हे जर खूप जास्त आणि अनेकदा दिसत असतील तर शरीरात काहीतरी गडबड असल्याचा हा संकेत आहे. बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचा एक संकेत क्रिस्टल आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये.
लघवीमध्ये फेस
अनेकदा लघवीमध्ये फेस दिसू लागतो आणि हा शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचा संकेत आहे. जर लघवीमध्ये सामान्यापेक्षा जास्त फेस दिसत असेल तर हा शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचा संकेत असू शकतो. याकडे गंभीरतेने बघून योग्य ते उपचार घ्यावे.