शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
2
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
3
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
4
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
6
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
7
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
8
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
9
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
10
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
12
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
13
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
14
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
15
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
16
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
17
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
18
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
19
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
20
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."

पचनक्रिया कितीही असेल खराब; तरी 'या' उपायांनी पोटाचे विकार नक्की राहतील लांब...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2020 12:39 PM

लॉकडाऊनमध्ये अनेकांचा वाटेल तेव्हा खायचं आणि वाटेल तेव्हा झोपायचं असा दिनक्रम सुरू आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे लोकांना घरीच बसण्याशिवाय पर्याय नाही. कोरोनाचा व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. बाहेर न जाता घरी लोक सुरक्षित असले तरी अनेकांना घरच्याघरी सुद्धा वातावरणातील बदलांमुळे आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. गॅस, एसिडिटी पोट साफ न होण्याची समस्या उद्भवत आहे. कारण पुरेशी हालचाल नसल्यामुळे खालेल्या अन्नाचं पचन होत नाही. परिणामी आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

तेलकट मैदायुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे ही समस्या वाढत जाते. लॉकडाऊनमध्ये अनेकांचा वाटेल तेव्हा खायचं आणि वाटेल तेव्हा झोपायचं असा दिनक्रम सुरू आहे. पण जेवणाची वेळ फिक्स असणं गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला पचनक्रिया चांगली राहण्याासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्हाला आपली पचनक्रिया चांगली ठेवता येईल तसंच गॅस, पोट फुगणं, अजीर्ण अशा समस्या होणार नाहीत.

लिंबू

लिंबातील औषधी गुणधर्म तुम्हाला माहितच असतील. लिंबू पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त पदार्थ समजला जातो. सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून घेतल्यास आपली पचनशक्ती चांगली सुधारते. कोमट पाण्यात लिंबू पिळून घेतल्यास शरीरात साठलेला मल बाहेर पडण्यास मदत होते.

धन्यांची पावडर आणि सुठ

दोन मोठे चमचे धने पावडर अर्धा चमचा सुंढ दोन ग्लास पाण्यात उकळून घ्या. हे पाणी उकळून प्या. पाणी पूर्णपणे उकळून झाल्यानंतर थंड करून ४-४ चमचे या पाण्याचे सेवन करा. या पाण्याचे सेवन केल्यामुळे  तुमची खराब पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होईल. 

दूध

पोट साफ होण्यास त्रास होत असेल तर  रात्री झोपताना एक ग्लास गरम दूध घ्या. त्याचबरोबर दुधात २ ते ३ चमचे एरंडेल तेल टाका आणि ते दूध प्या. असे केल्याने आतड्यांमध्ये साठून राहिलेला मल बाहेर येण्यास मदत होईल. याशिवाय जास्तीत जास्त पाणी पिण्याचा प्रय़त्न करा. (हे पण वाचा-CoronaVirus News : कोरोना संक्रमणाविरूध्द लढणाऱ्या सायकोटीनपासून शरीराला असू शकतो धोका)

खाल्लेल्या अन्नाचं पचन होण्यासाठी घाईत जेवणं टाळा. घाईघाईत खाताना प्रमाणापेक्षा अधिक खाल्लं जातं. म्हणूनच एका जागेवर शांत बसून आणि वेळेवर खायला हवं. पोट भरल्याची सूचना शरीरातील हामोर्न्स मेंदूला देतात आणि आपण गरजेपेक्षा अधिक न खाता, हवं तेवढंच खातो. तसंच हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करून तुम्ही आपली पचनशक्ती नेहमी चांगली ठेवू शकता. ( हे पण वाचा-वाढती उष्णता आणि पित्तामुळे तुम्हालाही होऊ शकतो तोंडातील अल्सर; 'असा' करा बचाव)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य