ड्रायफ्रुट्समध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स, कॅल्शिअम आणि अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आढळून येतं. त्यामुळे आहारात ड्रायफ्रुट्सचा समावेश केल्याने आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. परंतु, डायबिटीजच्या रूग्णांनी आपल्या आहारात समतोल राखणं अत्यंत आवश्यक असतं. कारण डायबिटीजचे रूग्ण ज्या पदार्थाचा आपल्या आहारात समावेश करतात त्याचा थेट परिणाम त्यांच्या ब्लड शुगरवर होत असतो. जाणून घेऊया डायबिटीजच्या रूग्णांनी कोणत्या ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश करावा त्याबाबत...
1. बदाम
एप्रिल 2011 मध्ये मेटाबॉलिज्म जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनामधून असं सिद्ध झालं की, बदाम खाल्याने शरीरामध्ये ग्लुकोजचा स्तर सामान्य राहतो. बदामामध्ये असलेले ऑक्सिडेटिव तणाव कमी करण्यासाठी आणि व्यक्तींना डायबिटीज तसेच हृदयासंबंधिच्या आजारांमध्ये फायदेशीर ठरतो. दररोज बदाम खाल्याने शरीरामध्ये मॅग्नेशिअमची कमतरताही दूर होते.
2. अक्रोड
डायबिटीज, ओबेसिटी आणि मेटाबॉलिज्म जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनानुसार, अक्रोडचा आहारात समावेश केल्याने पोट भरल्यासारखं वाटतं आणि जास्त खाण्याची क्रेविंग होत नाही. संशोधनातून असंदेखील सांगण्यात आलं आहे की, दररोज अक्रोड खाल्याने वजन कमी होतं. त्याचबरोबर हे डायबिटीजच्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरतं.
3. पिस्ता
पिस्त्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि गुड फॅट्स असतात. त्यामुळे पिस्ता खाल्याने बराच वेळ भूक लागत नाही. 2014मध्ये करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, पिस्ता खाल्याने डायबिटीजच्या रूग्णांमध्ये ब्लड शुगरचा स्तर नॉर्मल राहतो. दररोज फळांसोबत पिस्ता खाणंदेखील फायदेशीर ठरतं.
4. शेंगदाणे
शेंगदाण्यांमध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन आणि फायबर असतं. टाइप-2 डायबिटीजच्या रूग्णांसाठी शेंगदाणे अत्यंत फायदेशीर असतात. दररोज शेंगदाणे खाल्याने वजन कमी होण्यासोबतच हृदयाचा आजार होण्याचा धोका कमी होतो. तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यस मदत होते.
5. काजू
ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या डाएटमध्ये काजूचा समावेश अवश्य करावा. काजू ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यासोबतच हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतात. डायबिटीजच्या रूग्णांना काजूच्या सेवनाने फायदा होतो.
डायबिटीजपासून दूर राहण्याचे उपाय :
- व्यायाम नियमित करा. व्यायामाचे वेगवेगळे फायदे होतात. याने वजन नियंत्रणात राहतं, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित राहते आणि इतरही फायदे होतात. प्रत्येक दिवशी कमीत कमी ३० मिनिटे शारीरित हालचाल करण्याचे अनेक फायदे होतात.
- पोषक आहार घ्यावा. पोष्टीक कडधान्य, फळं आणि भाज्यांचा आहारात भरपूर समावेश करणे फायदेशीर ठरेल. याने तुमचं पोट भरलेलं राहील आणि तुम्ही प्रोसेस्ड आणि रिफाइंड फूड खाणार नाहीत.
- मद्यसेवन कमी करा आणि धुम्रपान बंद करा. फार जास्त मद्यसेवन केल्याने वजन वाढतं. याने ब्लड प्रेशरन आणि ट्रायग्लिसराइडचा स्तरही वाढतो. तर धुम्रपान करणाऱ्यांना धुम्रपान न करणाऱ्या लोकांच्या तुलनेत मधुमेह होण्याचा दुप्पट धोका असतो. त्यामुळे धुम्रपान सोडून द्यावे.
(टिप: आम्ही केवळ ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातील कोणत्याही गोष्टीचा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. त्याशिवाय काहीही करणे महागात पडू शकते.)