महिलांमध्ये पुरूषांपेक्षा जास्त आरोग्याच्या समस्या पाहायला मिळतात. कारण ते आपल्यापेक्षा दुसऱ्यांची काळजी घेण्यासाठी आपला संपूर्ण वेळ देत असतात. त्यामुळे त्या आपल्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. पण त्याच छोट्या वाटणाऱ्या समस्या पुढे जाऊन गंभीर समस्यांचं रूप धारण करतात. वेळीच या समस्यांकडे लक्ष दिलं तर सर्व समस्या दूर करणं सहज शक्य असतं. पण अनेकदा खूप काम केल्यामुळे कदाचित असं झालं, किंवा वातावरण ठिक नाही त्यामुळे असं झालं, असं सांगून ते सर्व गोष्टी टाळतात. अशा महिलांसाठी या सर्व गोष्टी जाणून घेणं अत्यंत आवश्यक असून स्वतःची काळजी घेणंही आवश्यक आहे.
जर तुमच्या शरीरामध्ये बदल जाणवत असतील, तर त्याचं कारण जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही अशा लक्षणांबाबत सांगणार आहोत, ज्यांचं रूपांतप पुढे जाऊन मोठ्या आणि गंभीर समस्यांमध्ये होण्याची शक्यता असते.
जाणून घेऊया कोणती लक्षणं आहेत :
1. पाठिच्या खालच्या भागामध्ये आणि पायांमध्ये वेदना होणं
मासिक पाळीदरम्यान पाठिच्या खालच्या भागामध्ये आणि पायांमध्ये वेदना होणं सामान्य असू शकतं. परंतु त्याआधी किंवा त्यानंतरही असं होणं सामान्य असू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही मासिक पाळीआधी किंवा नंतर हा त्रास सहन करत असाल तर तुम्हाला एंडोमेट्रियोसिसचा धोका होऊ शकतो. यामध्ये मासिक पाळीआधी स्नायूंमध्ये वेदना सुरू होत असेल आणि मासिक पाळीनंतरही तसचं सुरू राहत असेल. तर याकडे दुर्लक्षं करू नका.
2. मासिक पाळी दरम्यना लाल किंवा ब्राउन रंगाचं गोठलेलं रक्त येणं
मासिक पाळीदरम्यान प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लीडिंगचा सामना करावा लागतो. कोणाला जास्त ब्लीडिंग होतं तर कोणाला कमी. कोणाला हलक्या लाल रंगाचं ब्लीडिंग होतं, तर कोणाला गडद लाल रंगाचं ब्लीडिंग होतं. हे सर्व सामान्य आहे. पण मासिक पाळी दरम्यान जर गोठलेलं रक्त येत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. हे संकेत यूट्रसमध्ये फायब्रॉएड आहे. खरं तर हा गर्भाशयामध्ये होणारा एक ट्यूमर आहे. ज्याचा आकार हळूहळू वाडतो यामुळे अनियमित मासिक पाळी आणि ब्लीडिंगशिवाय वंधत्वाचा धोकाही वाढतो.
3. जास्त गरम होत असेल किंवा थंडी वाजत असेल तर
तुम्हाला जास्त गरम होत असेल किंवा थंडी वाजण्याचं कारण एस्ट्रोजनची पातळी असू शकतं. हे एक प्रकारचं हार्मोन असतं. जे महिला आणि पुरूष दोघांमध्येही आढळून येतं. परंतु एस्ट्रोजन हार्मोनची भूमिका महिलांमध्ये अधिक असते. हे शरीराचं तापमान प्रभावित करतात. त्यामुळे याची कमतरता आणि स्तरामध्ये झालेल्या बदलांमुळे प्रत्येक वेळी तुमच्या हातांना आणि पायांना थंडी वाजत असेल तसेच याव्यतिरिक्त एस्ट्रोजन हार्मोन महिलांमध्ये Fertility आणि सेक्सशी संबंधित समस्यांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे याला फीमेल सेक्स हार्मोन आणि फीमेल डेव्हलपमेंट हार्मोन असंदेखील म्हटलं जातं.
4. केस गळणं
अनेकदा केस गळण्याच्या समस्येकडे सर्व महिला दुर्लक्ष करतात. कारण त्यांना असं वाटत असतं की, वातावरणामधील बदल किंवा झोप पूर्ण न झाल्यामुळे होत असावं. परंतु केस जास्त गळत असतील तर ते आरोग्यासाठी घातक ठरतं. कारण केस निरोगी ठेवण्यासाठी टेस्टोस्टेरोन महिलांच्या ओवरीमध्ये फार कमी प्रमाणात असतं. याव्यतिरिक्त हे असंतुलित झाल्यामुळे वजन वाढतं, चेहरा आणि इतर अवयवांवर केस येणं यांसारख्या समस्या वाढतात.
5. पोट फुगणं
अनेक महिलांना मासिक पाळीदरम्यान पोट फुगण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. पण जर ही समस्या दर आठवड्याला होत असेल तर हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असतं. याचं कारण एंडोमेट्रियोसिस असू शकतं. यामध्ये पोट फुगल्यासारखं वाटतं आणि एंडोमेट्रियोसिस ऊतक तुटून जातात. याचा परिणाम प्रजनन क्षमतेवरही होतो आणि गरभधारणेमध्येही समस्या उद्भवतात. याव्यतिरिक्त सतत सूज येणं, पोटाचा ट्यूमर, हर्निया, लिव्हर इन्फेक्शन, ओव्हरियन कॅन्सर किंवा यूट्रस कॅन्सरही होऊ शकतो.
टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.