लघवी करताना होणाऱ्या त्रासाला अनेकजण केवळ इन्फेक्शन समजतात आणि किडनीच्या आजाराकडे लक्ष देत नाहीत. जास्तीत जास्त लोकांना इन्फेक्शन असतं त्यामुळे ते केवळ तसाच विचार करतात. किडनी स्टोन असं काही असेल असा विचारही अनेकजण करत नाहीत आणि मग त्यांना हेच महागात पडतं.
या त्रासाकडे दुर्लक्ष केल्याने किडनी स्टोनची साइज आणखी वाढते आणि तुमचा त्रासही. किडनी स्टोनबाबत अनेकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. अनेकांना असं वाटतं की, किडनीमध्ये स्टोन झाल्यावर केवळ पोटातच वेदना होतात. पण नेहमीच असं होत नाही.
किडनी स्टोन होण्याची वेगवेगळी लक्षणे असतात. त्यामुळे लघवी करताना होणाऱ्या त्रासाला केवळ यूरीन इन्फेक्शन म्हणून दुर्लक्ष करू नका. चला जाणून घेऊ चार मुख्य कारणे.....
लघवी करताना वेदना
जर लघवी करताना कंबर, ओटीपोट आणि पोटात वेदना होत असतील तर हे किडनी स्टोनचं लक्षण असू शकतं. या वेदना कधी कधी कमी तर कधी असह्य असतात. लघवी करताना कधी कधी रुतल्यासारखेही वाटू शकते.
लघवीचा रंग
जर लघवीचा रंग बदलत असेल तर याकडे लक्ष द्यायला हवे. जर लघवीमध्ये रक्तासारखं काही येत असेल तर किडनी स्टोनची शक्यता वाढते. कधी कधी ब्लेडरमध्ये संकुचन निर्माण झाल्यासही लघवीतून रक्त येतं.
कमी लघवी होणे
लघवी कमी येणे हेही किडनी स्टोनचं लक्षण मानलं जातं. असं होण्याचं कारण म्हणजे स्टोन जे किडनीमध्ये असतात ते यूरेटरमधून जातात. हे स्टोन ब्लेडरला ब्लॉक करतात. यामुळे लघवी कमी येण्याची समस्या होते.
उल्टी आणि मळमळ
किडनी स्टोनच्या लक्षणांमध्ये मळमळ होणे आणि उल्टी होणे हेही असतात. तुमच्या किडनीला स्टोन बाधित करतं त्यामुळे असं होतं. याने पचनक्रियाही प्रभावित होते.