मुंबई : डार्क चॉकलेट खाणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात डार्क चॉकलेट खाल्ल्याने स्ट्रेस कमी होतो. तसेच मूड चांगला होण्यास, स्मरणशक्ती आणि रोगप्रतिकार शक्तीही वाढण्यास मदत होते. चला जाणून घेऊया डार्क चॉकलेट खाण्याचे आळखी फायदे...
- तणाव कमी कऱण्यासाठी चॉकलेट अधिक फायदेशीर आहे. डार्क चॉकलेट खाण्याने तणाव कमी होतो.
- उच्च रक्तदाबाचा त्रास कमी कऱण्यासाठी चॉकलेटचे सेवन परिणामकारक ठरते.
- कोकोमध्ये असलेले अँटीऑक्सिंड्टस स्वास्थ चांगले राखण्यासाठी मदतशीर ठरतात.
- हृदयासाठी चॉकलेट फायदेशीर आहे. चॉकलेटच्या सेवनाने हृदयरोगाची शक्यता कमी होते.
- चॉकलेट खाण्याने व्यक्तीचा मूड सुधारतो. डार्क चॉकलेटच्या सेवनाने थकवा कमी होण्यास मदत होते.
- कॅलिफोर्नियाच्या सॅन डिगो विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनानुसार नियमितपणे चॉकलेट खाल्ल्याने वजन कमी होण्यात मदत होते.
- अमेरिकेच्या संशोधनानुसार, रोज हॉट चॉकलेटचे दोन कप सेवन केल्यास मानसिक स्वास्थ चांगले राहते. तसेच स्मरणशक्तीही वाढते.
- नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार रोज डार्क चॉकलेटचा एक तुकडा खाल्ल्यास डायबिटीज तसेच हृद्यासंबंधित आजारांचा धोका कमी होतो.
- या संशोधनादरम्यान १८ ते ६९ या वयोगटातील एक हजार १५३ लोकांचे निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणादरम्यान ज्यांनी नियमित १०० ग्रॅम चॉकलेट खाल्ले त्यांच्यात डायबिटीज तसेच हृदयासंबंधित आजारांचा धोका कमी आढळून आला.
- कोकोपासून बनवण्यात आलेली उत्पादने कार्डिओ मेटाबॉलिकचे स्वास्थ सुधारण्यास मदत करतात, असेही या संशोधनादरम्यान आढळून आलेय.