Bathing with cold water : सामान्यपणे जास्तीत जास्त लोक हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करण्याला प्राधान्य देतात. तर काही लोक असेही असतात जे थंडी असूनही या दिवसात थंड पाण्याने आंघोळ करतात. थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे अनेकांना माहीत नसतात. महत्वाची बाब म्हणजे वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे की, थंड पाण्याने आंघोळ करणं आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर आहे. अशात आज आम्ही तुम्हाला थंड पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे आणि त्याचं वैज्ञानिक कारण सांगणार आहोत.
अलर्टनेस वाढतो
एका रिपोर्टनुसार, थंड पाण्याने आंघोळ करण्याचा सर्वात मुख्य फायदा म्हणजे अलर्टनेस वाढतो. तसेच थंड पाण्याने आंघोळ केल्याने हार्ट रेट वाढतो आणि श्वास घेण्याची व सोडण्याची गतिही वाढते. थंड पाण्याने चेहरा धुतल्याने व्यक्ती जास्त अलर्ट होतो. ब्रिटीश जर्नल ऑफ स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरावर वेगवेगळा मनोवैज्ञानिक प्रभाव पडतो. यात हृदयाची गति वाढणे, ब्लड प्रेशर वाढणं, श्वासांची गति वाढणे इत्यादींचा समावेश करता येईल.
इम्यून सिस्टीम मजबूत होतं
जर्नल पीलॉस वनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, जे लोक थंड पाण्याने आंघोळ करतात ते २९ टक्के कमी आजारी पडतात. या रिसर्चमध्ये ३०१८ लोकांचा समावेश करण्यात आला होता. या रिसर्चमधून असे आढळून आले की, ज्या लोकांनी थंड पाण्याने आंघोळ केली ते कमी दिवस आजारी पडले. तसेच असेही समोर आले की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने लोकांची रोगप्रतिकारक शक्तीही वाढली. तसेच त्यांची रोजची कामे करण्याची क्षमताही वाढली.
मूड बूस्ट होतो
काही रिसर्चमधून असेही समोर आले की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने मूडही बूस्ट होतो. तसेच थंड पाण्याने आंघोळ केल्याने न्यूरोट्रान्समीटर जसे की, नॉर एपिनेफ्रीन आणि एंडॉर्फिन्स अॅक्टिव होतात. असंही आढळून आलं आहे की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने लोकांमध्ये डिप्रेशनची लक्षणे कमी होतात.
फिजिकल रिकव्हरी वाढेल
जर्नल ऑफ स्ट्रेंथ अॅन्ड कंडीशनिंग रिसर्चमध्ये प्रकाशित २३ पियर रिव्ह्यूड आर्टिकलमध्ये असं आढळून आलं की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने आणि कॉन्ट्रास्ट वॉटर थेरपी घेतल्याने अंगदुखी दूर होते. तसेच शरीराचा थकवाही दूर करण्यात मदत मिळते.
कशी कराल सुरूवात?
कुणालाही थोडावेळ थंड पाण्याने आंघोळ केल्यावर याचे सकारात्मक परिणाम बघायला मिळतील. तुम्ही काही कोमट पाण्याने आंघोळ केल्यावर काही वेळ थंड पाण्याने आंघोळ करू शकता. थंड पाण्याने आंघोळ करण्याचा वेळ ३० सेकंदपासून ते २ मिनिटांपर्यंत असावा. तर काही लोक सांगतात की, ५ ते १० मिनिटे थंड पाण्याने आंघोळ करावी.
काय घ्याल काळजी?
थंड पाण्याने आंघोळ केल्याचे वेगवेगळे फायदे होत असले तरी थंड पाण्याने आंघोळ करण्याला मेडिकल थेरपीचा पर्याय समजू नये. खासकरून अशा लोकांनी हे करू नये जे डॉक्टरांकडून डिप्रेशनचा उपचार घेत आहेत. हृदयरोग असलेल्या व्यक्तींनी थंड पाण्याने आंघोळ करणे टाळले पाहिजे. कारण यावेळी हृदयाची गति वाढते. अशात हार्ट अटॅक येण्याचाही धोका असतो.