शरीरात कोलेस्ट्रॉलचे (Cholesterol) प्रमाण वाढले तर आपल्या अडचणी जास्त वाढू शकतात. कारण यामुळे हृदयविकाराचा धोका तर वाढतोच पण अनेक प्रकारच्या शारीरिक समस्याही सुरू होतात. शरीरात कोलेस्ट्रॉलचे दोन प्रकार असतात, एक चांगले आणि दुसरे खराब. शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले तर स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येण्याची शक्यता वाढते. खरं तर, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अशा समस्या आपल्या मागे लागतात. जाणून घेऊया शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यास आपल्याला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि ते टाळण्यासाठी कोणते उपाय (Cholesterol Increases Sign) आहेत.
1. हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता -झीन्यूजने दिलेल्या बातमीनुसार, शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले तर हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कायम राहतो. अशा परिस्थितीत कोणालाही स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल. त्यामुळेच शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहिली पाहिजे, असे म्हटले जाते.
2. ब्रेन स्ट्रोक -याशिवाय शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणाबाहेर राहिल्यास ब्रेन स्ट्रोकही होऊ शकतो. वास्तविक, वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे मेंदूपर्यंत रक्ताभिसरण होऊ शकत नाही, त्यामुळे पक्षाघात होण्याची शक्यता असते.
3. दृष्टीही जाऊ शकते -याशिवाय डोळ्यांची दृष्टीही जाऊ शकते. वास्तविक, जेव्हा शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा रक्ताभिसरण तुमच्या डोळ्यांपर्यंत नीट पोहोचू शकत नाही, त्यामुळे डोळ्यांचा प्रकाशही जातो.
4. किडनीच्या समस्यांमध्ये वाढ -शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढते तेव्हा त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावर होतो. अशा परिस्थितीत किडनीशी संबंधित समस्याही वाढू शकतात. म्हणजेच अशा परिस्थितीत तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घ्यावी लागेल.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी हे काम करा
- सर्वप्रथम आपल्या आहारात हिरव्या भाज्या आणि फळांचा जास्तीत-जास्त समावेश करा. यासोबतच व्यायाम महत्त्वाचा आहे.
- ताण-तणावापासून दूर राहा, स्ट्रेसमुळेदेखील शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढू शकते आणि हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.