Benefits of eating banana: फळं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणून डॉक्टरही नेहमीच वेगवेगळी फळं खाण्याचा सल्ला देत असतात. सफरचंद, केळी नेहमी खाल्ली जाणारी फळं आहेत. पण रोज एक केळ खाल्ल्याने आरोग्याला काय फायदे मिळतात हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
पचनक्रियेस फायदेशीर
केळीमध्ये फायबर भरपूर असतं. जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी मदत करतं. याने पचन तंत्र योग्य पद्धतीने काम करतं. तसंच या प्रोबायोटिक्सही भरपूर असतं. जे आतड्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असतं. त्याशिवाय केळी खाल्ल्यने ब्लोटिंग म्हणजे पोट फुगण्याची समस्या सुद्धा कमी होते. पोट जास्त वेळ भरलेलं राहतं ज्यामुळे लवकर भूक लागत नाही.
हृदयासाठी हेल्दी
केळींमध्ये पोटॅशिअम आढळतं, जे ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करतं. सोबतच फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतं. कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहिल्याने हृदयरोगांचा धोकाही कमी होतो.
एनर्जी मिळते
केळी खाल्ल्याने शरीराला कॅलरी मिळतात, ज्यातून एनर्जी मिळते. सोबतच यात नॅचरल शुगरही असते, ज्यातूनही शरीराला एनर्जी मिळते. या कारणानेच एक्सरसाईज करण्याआधी किंवा सकाळी नाश्त्यामध्ये केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. इतकंच नाही तर केळी खाल्ल्याने मूडही चांगला होतो.
ब्लड शुगर कंट्रोल होते
केळींमध्ये भलेही शुगर असली तरी याच्या सेवनाने ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल राहते. हे काम लो ग्लायसेमिक इंडेक्सचं असतं ज्यामुळे केळी खाल्ल्यावरही ब्लडमध्ये शुगर हळूहळू रिलीज होते. सोबतच यातील फायबरमुळेही ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत मिळते.
मूड चांगला होतो
जर तुमचा काही कारणाने मूड खराब झाला असेल तर केळी खाऊन तुम्ही मूड चांगला करू शकता. केळीमध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं तत्व असतं जे सेराटोनिन हार्मोन्स रिलीज करण्यास मदत करतं. याच कारणाने केळी खाल्ल्यावर तुमचा मूड चांगला होतो.