शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

काय आहे पोटाचा अल्सर आणि काय असतात याची लक्षणे? दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 2:31 PM

symptoms of Stomach ulcers : जास्त वेळासाठी तुमच्या खाण्या-पिण्यात अनियमितता असेल तर पोटात फोडं होतात आणि ते फुटल्यावर त्याच्या जखमा तयार होतात. यालाच पोटाचा अल्सर म्हटलं जातं. पोटाच्या अल्सरची समस्या कधी कधी फार घातक ठरू शकते.

symptoms of Stomach ulcers : तोंडात अल्सर होतो हे सर्वानाच माहीत आहे. पण तोंडाप्रमाणे पोटातही अल्सर होतो हे मात्र फार कमी लोकांना माहीत असतं. पोटाच्या अल्सरमध्ये पोटात फोडं येतात आणि त्याचे घावही तयार होतात. पोटाच्या अल्सरची समस्या ही अनियमित लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्या-पिण्यामुळे होते. जास्त वेळासाठी तुमच्या खाण्या-पिण्यात अनियमितता असेल तर पोटात फोडं होतात आणि ते फुटल्यावर त्याच्या जखमा तयार होतात. यालाच पोटाचा अल्सर म्हटलं जातं. पोटाच्या अल्सरची समस्या कधी कधी फार घातक ठरू शकते.

पोटातील अल्सर हे छोट्या आतड्यांच्या सुरूवातीच्या भागात किंवा म्यूकलवर होणारे फोडं असतात. अल्सर होण्याचं प्रमुख कारणं पोटात अ‍ॅसिडचं प्रमाण वाढणं, चहा, कॉफी, सिगारेट आणि मद्यसेवन हे आहेत. त्यासोबतच जास्त आंबट खाणे, मसालेदार खाणे आणि गरम पदार्थ खाणे यानेही पोटात अल्सर होतात. 

काय आहेत याची लक्षणे?

१) पोटाच्या वरच्या भागात वेदना होणे - अल्सरची समस्या झाल्यावर पोटाच्या वरच्या बाहेरील भागात वेदना होऊ लागतात. असं बघितलं जातं की, अल्सरमध्ये जेवण केल्यावर पोटात वेदना सुरू होतात. तसेच पोट रिकामं असेल तरी वेदना होतात. या स्थितीत अन्न नलिकेच्या खालच्या भागात फोडं येतात. कधी-कधी अन्न नलिकेला छिद्रही पडतं.

२) अ‍ॅसिड तयार होणं - आपण जेव्हा काही खातो तेव्हा पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार होतं. याने अन्न पचन होत असतं. कधी कधी पोट खराब झाल्यावर हे अ‍ॅसिड वर अन्न नलिकेत जातं आणि जळजळ वाटू लागते. याचा प्रभाव घशात, दातांवर, श्वासांवर पडू लागतो. यानेच तोंडातही फोडं येतात. 

३) रक्ताची उलटी होणे - अल्सरमध्ये असं आढळतं की, उलटी होते किंवा उलटीसारखं वाटतं. जेव्हा अल्सर वाढतो तेव्हा त्रास आणखी वाढतो. कधी कधी उलटीतून रक्तही येऊ शकतं. अशात विष्ठेचा रंगही काळा होतो.

४) अ‍ॅसिडिटीची समस्या - अल्सरमुळे छातीत दुखण्याची समस्याही होते. या वेदना अॅसिडिटी रिफ्लेक्शनमुळे होतात. हृदयात होणाऱ्या वेदना या छातीच्या वरच्या भागात होतात आणि कधी कधी अॅसिडिटीमुळे त्याच जागी वेदना होतात. त्यामुळे यात फरक करणे कठीण होऊन बसतं.

५) वजन कमी होणे - पोटाच्या अल्सरने ग्रस्त लोकांचं वजन फार वेगाने कमी होऊ लागतं. याचं कारण म्हणजे अल्सर झाल्यार व्यक्ती खाण्याबाबत उदासीन होतो. त्यामुळे वजन कमी होऊ लागतं. त्यासोबतच अन्न पचनही होत नसल्याने वजन कमी होऊ लागतं. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य